२०२२ मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करून सुद्दा पोट न भरलेली हौशी कलाकार मंडळी २०२३ मध्ये सुद्दा नवीन विषयां सोबत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहेत. नवीन चित्रपट, मालिका, नाटकं सर्वकाही नवीन धाटणीचं नवीन कल्पनेचं काहीतरी अफाट घेऊन ही कलाकारमंडळी तयार असल्याचे दिसत आहे. अशातच एका नवीन टीम सोबत कलाकारांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.(amruta khanvilkar new project)
या फोटो मध्ये दिगदर्शक संजय जाधव, अभिनेता ओंकार भोजने, अभिनेत्री अमृता खानविलकर, कन्टेन्ट क्रियेटर जस्ट नील बिग बॉस फेम जय दुधाने, तेजस्विनी लोणारी, अभिनेता हरीश दुधाडे हे सगळे दिसत असून न्यू प्रोजेक्ट असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर येत्या वर्षात या नवीन टीमचा चित्रपट येणार कि वेब सिरीज? काय विषय असणार एकूणच काय तर या सगळ्या आवडत्या कलाकरांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/02/दुनिया-डोक्यावर-घेणार-हाय-रं....-10-1024x546.png)
आगामी चित्रपट किंवा वेब सेरीज निम्मित एकत्र आलेले हे कलाकार आधी कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसले नाहीत त्यामुळे यांची केमीस्ट्री पाहण प्रेक्षकांसाठी एक वेगळी मेजवानी असणार आहे. २०२२ मध्ये चंद्रा हे पात्र साकारून अभिनेत्री अमृता खानविलकर ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तर अभिनेता ओंकार भोजने ने त्याच्या हटके विनोदी शैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जस्ट नील हा नामांकित कन्टेन्ट क्रियेटर असून वेगवेगळ्या विषयांवर रील्स बनवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो.
====
हे देखील वाचा- ये शादी करना COMPULSORY है क्या? प्राजक्ता माळीचा थेट शंकर गुरुदेव यांना प्रश्न, गुरुदेवांच हटके उत्तर
====
गाजवलं आहे आपापलं क्षेत्र(amruta khanvilkar new project)
या फोटोमध्ये बिग बॉस मराठी मधील जय दुधाने आणि तेजस्विनी लोणारी हे सुद्दा दिसत आहेत. आपापल्या बीग बॉस पर्वात उत्कृष्ट खेळ दाखवून पर्व गाजवले होते. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रातून आपल्यता कलेचं उत्तम सादरीकरण करणारा अभिनेता हरीश दुधाडे सुद्दा या प्रोजेक्टचा एक भाग असणार आहे. हे झालं कलाकारांचं पण एक असं व्यक्तिमत्व आहे जे नेहमीच नवीन विषयांना, नवीन संकल्पनेला प्राधान्य देण्यास उत्सुक असत ते नाव म्हणजे दिगदर्शक संजय जाधव. संजय जाधव देखील नवीन कलाकृतीचा भाग असल्याचे दिसत आहे.(amruta khanvilkar new project)
तर नक्की हा प्रोजेक्ट काय असणार आहे हे पाहण्यासाठी एकूणच प्रेक्षक वर्ग उत्सुक असल्याचं दिसत आहे.