बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवाढव्य खर्च, बेभान होऊन नाचले अन्…; ‘तारक मेहता…’मधील जेठालालच्या लेकाचा शाही विवाहसोहळा, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 19, 2023 | 2:27 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Dilip Joshi Son Wedding

अवाढव्य खर्च, बेभान होऊन नाचले अन्…; 'तारक मेहता…'मधील जेठालालच्या लेकाचा शाही विवाहसोहळा, व्हिडीओ तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. कित्येक वर्ष सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे. विनोदी अशी ही मालिका प्रेक्षकांचं आजही भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालालची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. (Dilip Joshi Son Wedding)

आपल्या उत्कृष्ट कॉमेडीने लोकांची मने जिंकणारा जेठालालबाबत नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांच्या लेकाचा नुकताच लग्नसोहळा पार पडला आहे. दिलीप जोशी दुसऱ्यांदा सासरे झाले आहेत. त्यांचा मुलगा ऋत्विकचं नुकतंच लग्न झालं आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋत्विकच्या संगीत सोहळ्यातील खास फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये दिलीप गाणं गाताना दिसत आहेत.

आणखी वाचा – काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा, रुग्णालयामधून घरी आणलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

View this post on Instagram

A post shared by DILIP JOSHI & DISHA VAKANI FC ❤️ (@teamdiship)

दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विकचं १७ डिसेंबर रोजी विधिवत लग्न पार पडलं. ‘तारक मेहता’चे अनेक कलाकारही जेठालालच्या लेकाच्या लग्नात सहभागी झाले होते. तसेच दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी ही अनेक वर्षांपासून या मालिकेपासून दूर होती. तिने देखील ऋत्विकच्या लग्नात हजेरी लावली होती. मुलाच्या लग्नात दिलीप जोशी यांनी शेरवानीसह गुलाबी पगडी परिधान केली होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटो, व्हिडीओंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by DILIP JOSHI & DISHA VAKANI FC ❤️ (@teamdiship)

आणखी वाचा – “ताई टोपी उलटी घातली”, नवऱ्यासह डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याने ऐश्वर्या नारकरांची चूक पकडली, उत्तर देत म्हणाल्या…

View this post on Instagram

A post shared by DILIP JOSHI & DISHA VAKANI FC ❤️ (@teamdiship)

लग्नाच्या फोटोंनंतर आता ऋत्विकच्या संगीत व मेहंदी सोहळ्याचे फोटो दिलीप जोशी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये दिलीप जोशी गाणे गाताना दिसले. तर एका फोटोमध्ये अभिनेता पत्नीच्या हातावर मेहंदी लावताना दिसले. अनेक कलाकार मंडळींसह लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठकनेही दिलीप जोशी यांच्या मुलाच्या संगीत सोहळयाला हजेरी लावली.

Tags: dilip joshidilip joshi sondilip joshi son weddingentertainmentTaarak mehata ka ooltah chashamah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
marathi actress singer swanandi tikekar and ashish kulkarni shared photo with using 6 days to go hashtag

स्वानंदी टिकेकरची लग्नाची जोरदार तयारी, होणाऱ्या नवऱ्याने खास फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, "सहा दिवस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.