महाराष्ट्राचे लाडके जेष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यामध्ये नसले तरी ते प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने फक्त मराठी माणसालाच नाही तर संपूर्ण भारतीयांना त्यांच्या विनोदी अभिनयाचे वेड लावले. नुकताच मराठी भाषा दिन होऊन गेला. या निमित्ताने बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या साठी एक खास स्टोरी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. (anil kapoor lakshmikant berde)
या स्टोरीवर लिहीत त्यांनी असे म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने मला एक आठवण आलीय ती म्हणजे ‘हमाल दे धमाल’ हा माझा आजवरचा पहिला मराठी पिक्चर. माझं सौभाग्य आहे की मला या सिनेमात काम करायला मिळालं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्याच्या कारकीर्दीतला बेस्ट परफॉर्मन्स पाहता आला. माझा मित्र लक्ष्मीकांत, मला त्याची रोज आठवण येते. लक्ष्मीकांत यांच्या आठवणीत असे अनिल कपूर यांनी लिहिलं आहे.
वाचा अनिल कपूर आणि लक्ष्मीकांत यांच्या मैत्रीबद्दल – (anil kapoor lakshmikant berde)

लक्ष्मीकांत यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनी अनिल कपूर यांची ही स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला असून अनिल यांचे आभार मानले आहेत. अनिल यांनी लक्ष्मीकांत बेर्डे सोबत “हमाल दे धमाल” या मराठी सिनेमात काम केले आहे. अनिल यांनी शेअर केलेल्या स्टोरी वरून अनिल आणि लक्ष्मीकांत यांचे मैत्रीसंबंध किती चांगले होते हे समजते आहे. (anil kapoor lakshmikant berde)
अनिल सध्या हॉटस्टार वरील ‘द नाईट मॅनेजर’च्या भारतीय रूपांतरामध्ये रोपरच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिरीजमध्ये अनिल यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर पाइनच्या भूमिकेत दिसत आहे.
====
हे देखील वाचा – कोकणची लोकधारा जपत प्रभाकर मोरेंनी फॉरेनर्सला लावले थिरकायला
====
अनिल कपूर यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. तेजाब, विरासत, मिस्टर इंडिया, पुकार, स्लमडॉग मिलियनर सारख्या सुपरहिट चित्रपटाचा त्यात समावेश आहे. मात्र हे सर्व यश मिळवण्यासाठी अनिल कपूर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, आणि त्यांना त्याचे अचूक फळही मिळाले. अनिल कपूर यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.(anil kapoor lakshmikant berde)