हिंदी चित्रपट सृष्टीत लातूर जवळ असलेल्या उदगीरचा जन्म असलेल्या जयकिशन ने म्हणजेच सर्वांच्या लाडक्या जॅकी श्रॉफ ने प्रेक्षकांची मने जिंकली. देव आनंद यांच्या ‘स्वामीदादा’ चित्रपटातून जग्गूदादा ने रुपेरी पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. राम लेखन, त्रिदेव, परिंदा यांसारख्या अनेक चित्रपटांमधून जॅकी श्रॉफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही जॅकी श्रॉफ या नावाची क्रेझ किंचित ही कमी झालेली दिसत नाही. हिंदी चित्रपटांमधून घराघरात पोहचलेला हा अभिनेता आज यशाच्या शिखरावर आहे. पण या अभिनेत्याची एक खासियत म्हणजे हिंदी सोबतच अगदी अचूक मराठी जॅकी श्रॉफ यांना बोलता येत. असं जेष्ठ सिने पत्रकार ललिता ताम्हणे यांच्या एका मुलाखती दरम्यान सांगितलं होत.(Anil Kapoor Jackie Shroff Controversy)
म्हणून झालेलं जग्गू दादा आणि अनिल कपूर यांच्यात भांडण(Anil Kapoor Jackie Shroff Controversy)
मंडळी बॉलीवूड म्हणलं कि ग्लॅमर सोबतच जोडून शब्द येतो तो म्हणजे गॉसिप. अनेक लहान मोठ्या घटनांचं गॉसिप आजही या इंडस्ट्रीत केलं जात. गॉसिपिंगच्या या घटनांना मध्ये एका घटनेची चर्चा आजही केली जाते टी म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेता अनिल कपूर या दोघांमध्ये झालेल्या भांडणाची. ललिता यांच्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी नक्की त्यावेळी काय घडलेलं सांगितलं आहे.
हे देखील वाचा – अशोक मामा आणि निवेदिता यांच्या लव्हस्टोरीमध्ये आधीच घडला होता ‘DDLJ’ मधला तो सीन
जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर म्हणजे मनोरंजन विश्वात राम-लखन म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी. राम लखन, कर्मा, परिंदा, रूप कि राणी चोरो का राजा, १९४२ अ लव्ह स्टोरी, त्रिदेव अशा अनके चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण अंदर बाहर या चित्रपटाच्या वेळी या दोघांमध्ये बरेच मतभेद होते.या चित्रपटाच्या वेळी वयोमानानुसार मोठं कोण या वरून आधी कोणाचं नाव येणार यावरून दोघांमध्ये भांडण झालं होत असं जॅकी ने सांगितलं.(Anil Kapoor Jackie Shroff Controversy)
नाव आधी कोणाचं यावरून भांडण हे अतिशय शुल्लक गोष्ट आहे. पुढे त्यांनी हे ही सांगितलं कि तेव्हा मेचुरिटी नसल्यामुळे आमच्यात वाद झाला आम्हाला नंतर समजलं कि नाव कोणाचं आधी येणार या पेक्षा अभिनयाकडे भर देणं जास्त गरजेचं होत. त्या नंतर या दोघांमधला हा वाद मिटला आणि पुन्हा राम लखन ही जोडी एकत्र आली. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या या भांडणावरून हे समजत की कधी कोणत्या गोष्टीला महत्व द्यावं हे यांच्याकडून समजत.