मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने “बकुळा नामदेव घोटाळे” या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. तिच्या “अप्सरा आली” या गाण्यांनी सगळ्या प्रेक्षकांना तिच्या नृत्याची मोहिनी घातली. सोनाली तिच्या कामासोबतच सोशल मीडियावर देखील तेवढीच सक्रिय असते, सोनालीने नुकताच सनसेट च्या सावलीत फोटोशूट केले आहे. (Sonalee Kulkarni Photoshoot)

सोनालीने या फोटोशूटच्या पोस्टवर पल-पल बदल रहा है आस-पास ..साथ-साथ मैं भी अलग इतना ही, कि देख रही हूँ…हर पल ख़ुद को यूँ बदलते ढलते। असे कॅप्शन दिले आहे. सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत.

तुझे देख देख जीलू….. तसेच हर पल में अप्सरा ही नजर आती हो हमे अशा भन्नाट कमेंट्स सोनालीच्या या फोटोवर आल्या आहेत. सोनालीने कॅप्शनमध्ये तिच्या आजूबाजूंच्या वस्तूंप्रमाणे बदलत आहे असं संगतीये. त्यावर चाहत्यांनी देखील तिला “तू खरचं खूप बदलली आहेस” असं म्हंटल आहे. (Sonalee Kulkarni Photoshoot)

सोनाली लवकरच “मोगलमर्दानी छत्रपती ताराराणी” या सिनेमात राणी ताराराणीच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनाली ताराराणी या चित्रपटाव्यतिरिक्त झिम्मा 2 या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. सोनाली सोबत झिम्मा २ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग हे मुख्य कलाकार या चित्रपटात असणार आहेत. याचबरोबर अभिनेता हेमंत ढोमे याने या चित्रपटात अभिनयासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

सोनालीने बकुळ नामदेव घोटाळे या चित्रपटात नंतर अनेक मराठी चित्रपटात काम केलं. तिने तिच्या कामाला ब्रेक न लागू देता. सलग काम केल्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याच्या संधी प्राप्त झाल्या. सोनालीने दहाहून अधिक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम केले आहे. अनेक नवीन अभिनेत्री चित्रपट सृष्टीमध्ये आल्या परंतु सोनालीची जागा अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने घेतली नाही. हिरकणी या चित्रपटात तिने साकारलेली हिरकणीने प्रेक्षकांना जणू पुस्तकातल्या हिरकणीने आपल्या बाळा साठी पुन्हा धाव घेतल्याचा अनुभव करून दिला. (Sonalee Kulkarni Photoshoot)

आता सोनालीचे लग्न झाले असून तिचा नवरा हा लंडनमध्ये स्थायिक असतो. सोनाली मात्र तिच्या कामाशी कोणतीही तडजोड न करता तिच्या कामासाठी ती वेळ तसेच कामासाठी अखंड परिश्रम देखील करताना दिसून येते. सोनाली एक बिन्धात आणि बोल्ड विचारांची अभिनेत्री आहे. तिची प्रसिद्धी जरी शिगेला पोहोचलेली असली तरी सुद्धा ती कायम तिच्या चाहत्यांशी प्रेमानेच वागताना दिसते.