अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करते. आपल्या मराठमोळ्या अंदाजाने अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या अभिनय कौशल्यासोबत अमृता ही तिच्या नृत्य कौशल्याची झलक नेहमीच सर्वांसमोर सादर करते. चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारत ती नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत असते. मराठी सिनेविश्वाश अमृताने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अमृता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. अमृताने तिच्या चाहत्यांना मात्र एक धक्का दिला आहे.(amruta khanvilkar)
सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत अमृताने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याची माहिती तिने या पोस्टद्वारे करत चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये अमृताने लिहिलं आहे की, “लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल… परत येण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा आहे”. पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन मध्ये असं लिहिलं आहे की,”लवकरच पुन्हा भेटू… गुडबाय… मी ब्रेक घेत आहे”..

पहा अमृताने दिला चाहत्यांना धक्का – (amruta khanvilkar)
अमृता सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याच्या बातमीने मात्र तिचे चाहते नाराज झाले आहेत. अमृताच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. घटस्फोट घेत आहेस का? अशी कमेंट देखील चाहत्यांनी केली आहे. तर काही चाहत्यांनी काळजी व्यक्त करत, ‘लवकरच परत ये, काळजी घे, असे म्हटले आहे. तर एका युजरने ‘सोशल मीडियावरुन ब्रेक का घेत आहेस? पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’ असे म्हटलं आहे. (amruta khanvilkar)
====
हे देखील वाचा – महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच केदार शिंदेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक
====
अमृताच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमृताने सोशल मीडियावरुन ब्रेक का घेतला हे अद्याप तिने गुलदस्त्यात ठेवले आहे. दरम्यान या पोस्टवर काहींनी तिच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता अमृता सोशल मीडियावर कधी परतणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.(amruta khanvilkar)

अमृता खानविलकर संजय जाधव यांच्या ‘कलावती’ चित्रपटात झळकणार आहे. शिवाय ती धावपटू ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ललिता बाबर यांच्या जीवनावर आधारित ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.