मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. नुकत्याच आलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची व नृत्यविष्काराची झलक सर्वांना दाखवली आहे. आपल्या अभिनय व नृत्याने चर्चेत राहणारी अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
अशातच अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसह लंडनमध्ये गेली असून लंडनमध्ये ती तिच्या आई-वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहे. या लंडन ट्रीपचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अमृता व तिचे आई-वडील लंडनमधील काही खास ठिकाणी भेटी देत असून या भेटीचे काही खास क्षणही शेअर केले आहेत.
आणखी वाचा – साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?
अमृताने तिच्या या खास ट्रीपमधील आई-वडिलांबरोबरचे फोटो शेअर करत त्यांच्याविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “एका विशिष्ट वयानंतर पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखे आहे. यात सर्वात आधी तुम्हाला एका गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे ते म्हणजे त्यांचे खाणंपिणं. त्यानंतर त्यांच्याभोवती फिरण्याची ऊर्जा. मी आमच्या या ट्रीपचे काही फोटो व व्हिडीओ काढत आहे. जेणेकरुन ते नंतर त्यांच्या मित्रांना हे फोटो-व्हिडीओ दाखवू शकतील. आयुष्य हे एका वर्तुळासारखे आहे.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझे आई-वडील तर बिस्किटांवरुनही भांडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना अजिबातच एकत्र ठेवू शकत नाही. पहिल्या दिवशी विमानतळावर आम्ही ६ तास धीराने वाट पाहिली. कारण आमचं चेकइन दुपारी ३ वाजता होतं. त्यानंतर सगळ्या सामानासह आम्ही तीन मजले चाललो. त्यानंतर आम्ही लंडनमध्ये तांदूळ आणि भाजीच्या शोधातही अनेक फिरलो. कारण माझ्या आई-वडिलांना भारतीय पद्धतीचा तांदूळ खायची इच्छा होती.” दरम्यान, अमृताच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अमृताने शेअर केलेल्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलीच पसंती दर्शवली आहे.