टांझानियातील प्रसिद्ध गायक व ‘बिग बॉस १६’ फेम अब्दू रोजिक सध्या खूप चर्चेत आला आहे. जुलै महिन्यात ७ तारखेला तो लग्नबंधनात अडकणार आहे. पण त्याआधी त्याचा साखरपुडा पार पडला. त्याच्या साखरपुड्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्याच्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी अब्दू व त्याच्या होणाऱ्या बायकोच्या ऊंचीवरुन त्याची मस्करीही केली आहे. त्यामुळे आता अब्दूने एक व्हिडीओ बनवला असून त्याने आपली परिस्थिति व्यक्त केली आहे. (abdu rozik on negative comments)
दुबई येथील अमिराबरोबर ७ जुलै २०२४ रोजी अब्दू लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर साखरपुड्याचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. पण या फोटोवर अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. त्यावर आता तो व्यक्त झाला आहे. त्याने व्हिडीओमध्ये सांगितले की, “माझी ऊंची कमी आहे त्यामुळे मी लग्न करु शकत नाही का? कृपया सोशल मीडियावर चुकीच्या प्रतिक्रिया करु नका. अशा चुकीच्या किंवा वाईट प्रतिक्रिया आल्याने माझ्या मानसिकतेवर परिणाम होत आहे”.
त्यानंतर त्याने फोट्रो शेअर करत लिहिले की, “ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनापासून आभार. पण मला काही वाईट प्रतिक्रियांचादेखील सामना करावा लागला आहे. जे माझ्याबद्दल वाईट लिहीत आहेत, माझी मस्करी करत आहेत त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. अमिराचे कुटुंबदेखील या प्रतिक्रिया वाचत असेल. या प्रतिक्रियांमुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. खूप चर्चा केल्यानंतर माझ्या सर्व वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक केल्या. पण हे सगळं खूप वाईट आहे”.
आणखी वाचा – राखी सावंत रुणालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, नेमकं झालं तरी काय?
पुढे तो म्हणाला की, “जे लोक पाहू शकत नाहीत, ज्यांचे हात पाय नाहीत ते लोक लग्न करत नाहीत का? सर्वजण लग्न करतात, खुश रहातात. पण मी छोटा आहे. माझी ऊंची कमी आहे त्यामुळे लोक माझी मस्करी करत आहेत. मी अल्लाहच्या कृपेने खुश आहे. माझे आरोग्यही चांगले आहे. त्यामुळे मलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे. कोणावरही अशा प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पहिल्यांदा मला स्वतःला बघून खूप लाज वाटायची. पण स्वतःसाठी उभे राहणे खूप गरजेचे आहे”.
अब्दू ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वामध्ये दिसून आला होता. या शोच्या माध्यमातून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.