शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?

Saurabh Moreby Saurabh More
मे 15, 2024 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla tar mag star pravah serial update Will Sayali and Arjun get separated?

साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या मनोरंजक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रक्ट मॅरेजबद्दलचे कथानक सुरु आहे. आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, चैतन्य साक्षीकडे सँडविच खायची इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर ती सँडविच करायला निघून जाते, तेव्हा चैतन्य लगेच तिचा फोन तपासण्यासाठी पासवर्ड टाकायचा प्रयत्न करतो.

चैतन्य पासवर्ड तपासताना महीपतचा साक्षीला फोन येतो. शिवाय महीपत मधुभाऊंबद्दल नवीन काहीतरी कटकारस्थानाचं बोलल्याचंही ऐकतो, पण संशय येऊ नये म्हणून चैतन्य फोन कट करतो. त्यापुढे, महीपतकडे जेलमध्ये फोन कसा? असा विचार चैतन्य करतो. त्याचबरोबर चैतन्य अर्जुनला महीपतकडे जेलमध्ये मोबाईल असल्याचे मॅसेजद्वारे सांगताना नेमकी साक्षी येते आणि चैतन्यचा मोबाईल हिसकावून घेते. त्यावर चैतन्य साक्षीची यापुढे तिच्यासमोर मोबाईलकडे बघणारही नसल्याची माफी मागतो आणि मोबाईल परत घेतो.

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

एकीकडे सायली दिनदर्शिकेवर तारीख नोंद करून अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला दोनच दिवस उरले असल्याची आठवण करून देते. यानंतर ती निघून जात असताना अर्जुन तिला अडवायला जातो आणि त्याला ठेच लागते. यावर सायली अर्जुनला लगेच मलम लावून देते आणि अर्जुनला “मी आहे तोवर मलम लावून देईन नंतर कोण आहे?” असं म्हणते. त्यावर अर्जुनही सायलीला खरंच दोन दिवसांनी निघून जाणार असल्याचं विचारतो.

आणखी वाचा – राखी सावंत रुणालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, नेमकं झालं तरी काय?

यापुढे सुभेदारांच्या घरात काकरे भगिनींची एन्ट्री होताना दिसणार आहे. पूर्णा ताईच्या आम्ही बहिणी असल्याचं त्या दोघी सायलीला सांगतात आणि पूर्णाताईला सरप्राईज द्यायला आल्याचं त्या सांगतात. पूर्णाआईसुद्धा त्यांना बघून आनंदी होते. त्या दोघी पूर्णाआईला मंगळागौरीचा ग्रुप जॉईन करायला सांगतात.

आणखी वाचा – “लाजा वाटत नाहीत का?”, घाटकोपरमधील ‘त्या’ होर्डिंग प्रकरणी शशांक केतकरचा संताप, म्हणाला, “आमच्या जीवाशी खेळणं बंद करा”

दरम्यान, गेले काही दिवस अर्जुन-सायली यांचे प्रेम बहरतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मात्र आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत की काय? याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्यात उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आगामी भागांत अर्जुन-सायली कॉन्ट्रक्ट मॅरेजनुसार खरंच एकमेकांपासून वेगळे होणार की? त्यांच्यातील प्रेम पुन्हा बहरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.       

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsTharla Tar Mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Shamita Shetty is suffering from endometriosis shared post-surgery video

शिल्पा शेट्टीच्या बहिणीला गंभीर आजार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्जरीही झाली, आता अशी आहे अवस्था, म्हणाली, "खूप त्रास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.