रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिल्पा शेट्टीच्या बहिणीला गंभीर आजार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्जरीही झाली, आता अशी आहे अवस्था, म्हणाली, “खूप त्रास…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 15, 2024 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shamita Shetty is suffering from endometriosis shared post-surgery video

शिल्पा शेट्टीच्या बहिणीला गंभीर आजार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्जरीही झाली, आता अशी आहे अवस्था, म्हणाली, "खूप त्रास..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीबद्दल नुकतीच एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीला एक दुर्मिळ आजार झाला असून या एका व्हिडीओद्वारे तिने या आजाराबद्दलची माहितीही शेअर केली आहे. अभिनेत्रीला ‘एंडोमेट्रिओसिस’ नावाचा आजार जडला होता, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेनंतर तिने हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच तिला झालेल्या या आजाराची माहितीही दिली आहे.

शमिताने हॉस्पिटलच्या बेडवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये ती असं म्हणत आहे की, “ज्या महिला हा व्हिडीओ पाहत आहेत, त्यांनी जरा लक्ष द्या किंवा गुगलवर जाऊन ‘एंडोमेट्रिओसिस’ या आजाराविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न करा. कारण ही समस्या काय आहे? हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यामुळे खूप वेदना आणि खूप त्रास होतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही कारणास्तव वेदना होतात तेव्हा तुमच्या शरीराचे ऐका. दुर्लक्ष करू नका”.  

View this post on Instagram

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

तसेच या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “तुम्हाला माहीत आहे का की जवळपास ४०% महिलांना ‘एंडोमेट्रिओसिस’चा त्रास होतो आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहितीदेखील नसते. मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे, माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वार्टी आणि माझ्या जीपी डॉ. सुनीता बॅनर्जी यांचे आभार मानायचे आहेत की, त्यांनी माझ्या वेदनांचे मूळ कारण शोधून काढले”.

आणखी वाचा – राखी सावंत रुणालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, नेमकं झालं तरी काय?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या डॉक्टरांचे मी आभार मानते की, त्यांनी माझ्या वेदनांचे खरे कारण सापडेपर्यंत त्यांचे संशोधन थांबवले नाही. आता माझा हा आजार शस्त्रक्रियेद्वारे माझ्या शरीरातून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता मी चांगल्या आरोग्याची आणि अधिक वेदनामुक्त दिवसांची वाट पाहत आहे.”

आणखी वाचा – साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?

दरम्यान, अभिनेत्रीच्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक शुभचिंतकांनी तिला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. “लवकर बरी हो, काळजी घे, तू यातून लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाचरणी प्रार्थना करतो” अशा अनेक कमेंट्स करत तिला धीर देण्याचा व काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.     

Tags: Shamita ShettyShamita Shetty EndometriosisShamita Shetty Endometriosis News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Amruta Khanvilkar shared photos of her London trip with parents on social media

"आई-वडील बिस्किटांवरुनही भांडतात अन्…", आई-वडिलांना लंडनला घेऊन जाताना अमृता खानविलकरचा गोंधळ, म्हणाली, "तांदूळ व भाजी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.