मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई-वडील बिस्किटांवरुनही भांडतात अन्…”, आई-वडिलांना लंडनला घेऊन जाताना अमृता खानविलकरचा गोंधळ, म्हणाली, “तांदूळ व भाजी…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 15, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar shared photos of her London trip with parents on social media

"आई-वडील बिस्किटांवरुनही भांडतात अन्...", आई-वडिलांना लंडनला घेऊन जाताना अमृता खानविलकरचा गोंधळ, म्हणाली, "तांदूळ व भाजी..."

मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. नुकत्याच आलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची व नृत्यविष्काराची झलक सर्वांना दाखवली आहे. आपल्या अभिनय व नृत्याने चर्चेत राहणारी अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

अशातच अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसह लंडनमध्ये गेली असून लंडनमध्ये ती तिच्या आई-वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहे. या लंडन ट्रीपचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये अमृता व तिचे आई-वडील लंडनमधील काही खास ठिकाणी भेटी देत असून या भेटीचे काही खास क्षणही शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आणखी वाचा – साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?

अमृताने तिच्या या खास ट्रीपमधील आई-वडिलांबरोबरचे फोटो शेअर करत त्यांच्याविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “एका विशिष्ट वयानंतर पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखे आहे. यात सर्वात आधी तुम्हाला एका गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे ते म्हणजे त्यांचे खाणंपिणं. त्यानंतर त्यांच्याभोवती फिरण्याची ऊर्जा. मी आमच्या या ट्रीपचे काही फोटो व व्हिडीओ काढत आहे. जेणेकरुन ते नंतर त्यांच्या मित्रांना हे फोटो-व्हिडीओ दाखवू शकतील. आयुष्य हे एका वर्तुळासारखे आहे.”

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या बहिणीला गंभीर आजार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्जरीही झाली, आता अशी आहे अवस्था, म्हणाली, “खूप त्रास…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझे आई-वडील तर बिस्किटांवरुनही भांडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना अजिबातच एकत्र ठेवू शकत नाही. पहिल्या दिवशी विमानतळावर आम्ही ६ तास धीराने वाट पाहिली. कारण आमचं चेकइन दुपारी ३ वाजता होतं. त्यानंतर सगळ्या सामानासह आम्ही तीन मजले चाललो. त्यानंतर आम्ही लंडनमध्ये तांदूळ आणि भाजीच्या शोधातही अनेक फिरलो. कारण माझ्या आई-वडिलांना भारतीय पद्धतीचा तांदूळ खायची इच्छा होती.” दरम्यान, अमृताच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अमृताने शेअर केलेल्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलीच पसंती दर्शवली आहे.   

Tags: amruta khanvilkarAmruta Khanvilkar London Tripmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
abdu rozik on negative comments

"वाईट बोलत आहेत आणि…", साखरपुड्यानंतर ट्रोल करण्यावरुन अब्दू रोजिकचा संताप, म्हणाला, "तिचे कुटुंबियही वाचत असतील तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.