शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’मध्ये दौलतरावाच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे नको होता, म्हणाली, “त्याऐवजी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 29, 2023 | 6:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta khanvilkar on adinath kothare

...म्हणून अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’मध्ये दौलतरावाच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे नको होता, म्हणाली, “त्याऐवजी...”

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट मराठीतील सुपरहिट चित्रपट ठरला. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई करत प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटात केलेलं काम उल्लेखनीय होतं. अमृताने तिच्या नृत्य कौशल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटामध्ये आदिनाथने साकारलेली दौलतराव ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. आता याबाबत अमृताने केलेलं भाष्य चर्चेचा विषय ठरत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत राजकीय मंडळींसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये अमृता उपस्थित राहणार आहे. झी मराठी वाहिनीने या संबंधित एक प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती दौलतराव ही भूमिका दुसऱ्याच अभिनेत्याने साकारावी असं म्हणताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अवधूत अमृताला एक प्रश्न विचारतो. अवधूत तिला प्रसाद ओकचा फोटो दाखवतो. दरम्यान त्याच्याबाबत व्यक्त होण्यास तो अमृताला सांगतो. यावर अमृता म्हणते, “मला आजही असं वाटतं की, ‘चंद्रमुखी’ चित्रपटामधील दौलतराव ही भूमिका त्यानेच साकारायला हवी होती”. यावर अवधूत तिला एक प्रश्न विचारतो.

आणखी वाचा – “जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अवधूत म्हणतो, “ज्याने दौलतराव देशमाने ही भूमिका साकारली त्याला वाईट वाटेल असं तुला वाटत नाही का?”. या प्रश्नानंतर प्रोमो संपला असल्याचं दिसत आहे. पण अमृता यावर काय उत्तर देणार? खरंच आदिनाथला याबाबत वाईट वाटणार का? हे पाहावं लागेल.  

Tags: adinath kothareamruta khanvilkarmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Subhedar film Box Office Collection in five days

'सुभेदार' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पाच दिवसांमध्ये कमावले इतके कोटी, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.