Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या शाही रिसेप्शनसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली. बॉलिवूड कलाकारांच्या व दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत त्यांच्या ग्रँड रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. बॉलिवूड कलाकार तसेच दाक्षिणात्य कलाकार व नेते मंडळींनी या सोहळ्याला उपस्थित राहत नवविवाहित जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर या जोडीने ११ जानेवारी रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. उदयपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर स्वप्नांची मायानगरी मुंबईत येथील जियो वर्ल्डमध्ये या जोडीसाठी खास रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
नुपूर आणि आयरा यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूड व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. नुपूर-आयराच्या स्वागत समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिले. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी शिंदेंनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली. एकनाथ शिंदेंचा पापाराझींना हात जोडून नमस्कार करनाचा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीसदेखील या रिसेप्शन पार्टीत उपस्थित राहिल्या. पिवळ्या रंगाचा डीपनेक ब्लाऊज, प्लाझो आणि त्यावर सारख्याच रंगाचे पायघोळ जॅकेट असा लूक अमृता यांनी केला होता. या ड्रेसवर त्यांनी केस कुरळे करत ओपन हेअर लूक केला होता. त्यांनी रिसेप्शनसाठी एन्ट्री केल्यानंतर पापाराझींना पोजही दिली.
एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबीयांनी आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावली होती. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तर राज ठाकरे यांनी पत्नीसह हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आयरा-नूपुरच्या या ग्रँड रिसेप्शनला बॉलीवूड व दाक्षिणात्य कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं.