शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या लग्नाला अमृता फडणवीसांच्या लूकने वेधलं लक्ष, मुखमंत्री एकनाथ शिंदेही बॉलिवूड पार्टीत पोहोचले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2024 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Wedding

आयरा-नुपूरच्या लग्नाला अमृता फडणवीसांच्या लूकने वेधलं लक्ष, मुखमंत्री एकनाथ शिंदेही बॉलिवूड पार्टीत पोहोचले अन्…

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या शाही रिसेप्शनसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली. बॉलिवूड कलाकारांच्या व दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत त्यांच्या ग्रँड रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. बॉलिवूड कलाकार तसेच दाक्षिणात्य कलाकार व नेते मंडळींनी या सोहळ्याला उपस्थित राहत नवविवाहित जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर या जोडीने ११ जानेवारी रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. उदयपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर स्वप्नांची मायानगरी मुंबईत येथील जियो वर्ल्डमध्ये या जोडीसाठी खास रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.

नुपूर आणि आयरा यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूड व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. नुपूर-आयराच्या स्वागत समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिले. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी शिंदेंनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली. एकनाथ शिंदेंचा पापाराझींना हात जोडून नमस्कार करनाचा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – “संसार म्हटलं की व्यवहार आला”, बायकोच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझं खूप देणं लागतो पण…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय मिसेस उपमुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीसदेखील या रिसेप्शन पार्टीत उपस्थित राहिल्या. पिवळ्या रंगाचा डीपनेक ब्लाऊज, प्लाझो आणि त्यावर सारख्याच रंगाचे पायघोळ जॅकेट असा लूक अमृता यांनी केला होता. या ड्रेसवर त्यांनी केस कुरळे करत ओपन हेअर लूक केला होता. त्यांनी रिसेप्शनसाठी एन्ट्री केल्यानंतर पापाराझींना पोजही दिली.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

आणखी वाचा – ‘या’ दिवशी होणार प्रथमेश परबचा साखरपुडा, अभिनेत्याच्या होणाऱ्या बायकोने सांगितली तारीख, म्हणाली, ” लग्नाची तारीख…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबीयांनी आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावली होती. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तर राज ठाकरे यांनी पत्नीसह हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आयरा-नूपुरच्या या ग्रँड रिसेप्शनला बॉलीवूड व दाक्षिणात्य कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं.

Tags: aamir khan daughter weddingaditya thackeraycm eknath shindeentertainmentira khan and nupur shikhare receptionraj thackeray
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Tejashri Pradhan On Trolling

"तुमच्याच आजूबाजूची लोकं…", तेजश्री प्रधानने ट्रोलर्सबाबत केलं भाष्य, अभिनेत्री सल्ला देत म्हणाली, “आमच्याबद्दल बोलताना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.