‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा हिने आजवर तिच्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र हास्यजत्रेतून एक्झिट घेत ती नाटकविश्वाकडे, मालिकाविश्वाकडे वळली आहे. आज विशाखा हास्यजत्रेत नसली तरी तिचे चाहते तिला हास्यजत्रेत मिस करत आहेत. प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठी विशाखा ‘शुभविवाह’ या मालिकेतून भेटीस आली आहे. याशिवाय नेहमीच ती रिल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Vishakha Subhedar Troll)
अशातच ‘स्टार प्रवाह’च्या दिवाळी धमाका साठी परफॉर्म करण्याआधी विशाखाने बनवलेल्या एका रिलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशाखाने ‘सांगा या पोरीला…’ या गाण्यावर केलेला अभिनय साऱ्यांच्या भुवया उंचावतोय. यांत विशाखाचा आगळावेगळा ड्रेस आणि तिची हटके हेअरस्टाईल साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये विशाखाने तिच्या नव्या हेअरस्टाईलने तिचे केस गरागरा फिरवलेले पाहायला मिळत आहेत.
विशाखाच्या या नव्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी तिचा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “चांगलं होतं पण नंतर जे हेलिकॉप्टर झालंय ना तेच जरा, पण खूप छान ताई” असं म्हणत चेष्टा केली आहे. यावर विशाखाने प्रतिक्रिया देत, “तीच तर गंमत” असं म्हटलं आहे. तर एकाने ‘इज्जत घालवली’ अशी कमेंट केली आहे, यावर विशाखाने सडेतोडपणे प्रतिउत्तर देत प्रश्न केला की, ‘ह्यात काय इज्जत घालवली?’. तर अनेकांनी तिच्या नव्या हेअरस्टाईलचं कौतुकही केलं आहे.

विशाखा नेहमीच तिच्या नृत्यामुळे, अभिनयामुळे चर्चेत असते. याशिवाय आता ती स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असलेली पाहायला मिळते. बरेचदा विशाखा तिच्या डान्स व्हिडीओमुळे ट्रोलही होते, त्यावेळी ती त्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. विशाखाने चंदेरी रंगाचा जॅकेट असलेला ड्रेस, त्यावर केलेली आकर्षक केशभूषा असलेला फोटो याआधीही पोस्ट केला होता, यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आला होतं, मात्र तेव्हाही विशाखाने यावर स्पष्टीकरण देत सडेतोड उत्तर देत नेटकऱ्यांची बोलती बंद केली होती.