मंगळवार, एप्रिल 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१३ वर्षांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय, फक्त ‘या’ व्यक्तींनाच निधनानंतर देणार संपत्ती कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Bachchan On Property

मृत्यनंतर अमिताभ बच्चन त्यांच्या प्रॉपर्टीचं काय करणार?, मुलाखतीद्वारे केला खुलासा

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. बच्चन कुटुंबाची बरेचदा चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. सध्या अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांची चपळता कायम आहे. दरम्यान, ते त्यांच्या कौटुंबिक संबंधांमुळे चर्चेत असतात. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या कानावर येत आहेत. याच दरम्यान, त्यांची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती कशी वाटली जाईल याबाबत भाष्य केलं आहे. (Amitabh Bachchan On Property)

आपल्या इच्छेचा संदर्भ देत ते म्हणाले की, मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटणी केली जाईल. २०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले होते, “मी एक गोष्ट ठरवली होती की मी त्यांच्यात भेदभाव करणार नाही. जेव्हा मी मरेन, तेव्हा माझ्याकडे जे काही आहे ते माझी मुलगी आणि माझ्या मुलामध्ये समान वाटले जाईल. यांत कोणताही भेदभाव केला जाणार नाही”. हे सर्व त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासह बसून ठरवले असल्याचेही अमिताभ यांनी सांगितले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तुझ्यासारखी रिकामी नाही”, नको त्या मुद्द्यावरुन अभिजितशी वाद घालतेय निक्की, नक्की सिद्ध करायचंय काय?

अमिताभ म्हणाले, “जया व मी हे खूप आधी ठरवलं होतं. प्रत्येकजण म्हणतात की मुलगी ही परक्याचं धन आहे. ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाते, पण माझ्या नजरेत ती आमची मुलगी आहे आणि तिला अभिषेकचा तेवढाच हक्क आहे”. गेल्या वर्षी अमिताभ यांनी त्यांचा ‘जलसा’ हा बंगला श्वेता बच्चन नंदा यांना भेट म्हणून दिला होता. त्यावेळी त्याची किंमत ५० कोटी रुपये होती. रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड सुपरस्टारच्या कुटुंबाची एकूण संपत्ती १६०० कोटी रुपये आहे. याच संवादात अमिताभ यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनबरोबरच्या नात्याबद्दलही सांगितले.

आणखी वाचा – Video : उच्चशिक्षणासाठी लंडनला गेला विशाखा सुभेदारांचा लेक, मिठी मारुन रडू लागल्या अन्…; म्हणाल्या, “स्वप्न पाहिलंस…”

याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते अभिषेकला मित्र मानतात. ते म्हणाले, “अभिषेकच्या जन्माआधीच मी ठरवलं होतं की, मला मुलगा झाला तर तो माझा मुलगा नाही तर माझा मित्र असेल. ज्या दिवशी त्याने माझे बूट घालायला सुरुवात केली, तो माझा मित्र झाला. त्यामुळे आता मी त्याला मित्राप्रमाणे वागवतो. मी त्याला मुलगा म्हणून क्वचितच पाहतो. मला त्याची वडील म्हणून काळजीही वाटते, वडिलांप्रमाणे त्याची काळजी घेईन, वडिलांप्रमाणे सल्ला देईन. पण जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा आम्ही मित्रांसारखे बोलतो”.

Tags: Amitabh Bachchan childrenAmitabh Bachchan On PropertyAmitabh Bachchan Property
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Gayatri Datar Wedding
Entertainment

Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

एप्रिल 27, 2026 | 2:34 pm
Rohan Gujar Twins Baby
Entertainment

‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

एप्रिल 27, 2026 | 12:12 pm
Riteish Deshmukh to Bageshwar Baba
Entertainment

छत्रपती शिवाजी महाराजांबत चुकीचं वक्तव्य करणं बागेश्वर बाबांना पडलं महागात, अभिनेता भडकला

एप्रिल 27, 2026 | 11:11 am
Next Post
Bigg Boss Marathi fame actress Sai Lokur show her girl face for the first time and also shared a special post

इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, "आई म्हणून माझा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.