Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सध्या सहावा आठवडा सुरु आहे. गेल्या आठडव्यात या घरात अनेक घडामोडी झाल्या. अभिजीत व निक्की यांच्यात अनेक वाद झाले. मात्र त्यांच्यातील हे वाद मध्ये मध्ये संपलेले दिसले. दोघांमध्ये पुन्हा मैत्रीही झालेली दिसली. मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हा वाद पुन्हा झालेला दिसला. ‘बिग बॉस’च्या घरात टास्क दरम्यान निक्की व अभिजीत पुन्हा भांडताना दिसले. निक्कीला अभिजीतने दिलेले ज्ञान खटकले असल्याचं सांगितलं. शिवाय अभिजीतची शाळा घेत निक्कीने त्याची बोलती बंद केली. मात्र याला अभिजीतनेही सडेतोड उत्तर दिलं.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की अभिजीतला म्हणते, “तू मला सांगू नकोस. शब्द जपून वापर, मुद्दे कसे मांडत आहेस. तुलाही माहित आहे की या घरात अगदी पहिल्या दिवसापासून मुद्दे मांडत आहे. तू मला म्हटलं शब्द जपून वापर”. यावर अभिजीत वाद घालत म्हणतो, “मी कुठे नाही म्हटलं. कारण त्याच्याआधी तू मला म्हणाली शब्द जरा जपून वापर. तुला कळत नाही का? असंही तू मला म्हणाली. आणि त्याच्यावर मी तुला उत्तर दिलं”. यावर निक्की म्हणते, “मी वैयक्तिक मुद्द्यावर बोलले. तू चुकीचा अर्थ घेतला”.
यावर अभिजीत म्हणाला, “ज्या गोष्टीला घेऊन तू बोलली त्यालाच मी उत्तर दिलं. मी एकही शब्द वेगळा वापरला नाही. तुला हवं तर तू पूर्ण संभाषण काढून बघ”. यावर निक्की रागात म्हणते, “तेवढा माझ्याकडे वेळ नाही. मी तुझ्यासारखी रिकामी नाही आहे”. यावर अभिजीतही वाद घालत म्हणतो, “माझ्याकडे सुद्धा इतका वेळ नाही”.
याआधीच्या प्रोमोमध्ये निक्की व अभिजीत एकत्र बोलतानाही दिसले. यावेळी निक्कीची बाजू न घेतल्याने ती अभिजीतला जाब विचारताना दिसली. तू काहीतरी बोलणं अपेक्षित होतं पण तू तसं केलं नाही हे फार चुकीचं केलं असं निक्की म्हणते. निक्की व अभिजीत बोलत असताना अरबाज त्यांच्याकडे रागाने पाहतो. अगदी पहिल्या दिवसापासून अरबाजला निक्की व अभिजीत यांची मैत्री पटत नव्हती. आता निक्की अभिजीतवरील राग टास्कमध्ये काढणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.