महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे राजकरणासह मनोरंजण क्षेत्रातही तितकेच सक्रिय असतात. मराठी चित्रपट तसेच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासह त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्यात अमेय खोपकर कायमच अग्रेसर असतात. अशातच त्यांच्या लेकानेही मराठी मनोरंजन विश्वाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अमेय खोपकर यांचा लेक ईशान खोपकर याने त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु केला आहे. याचीच एक खास पोस्ट अमेय यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
बघता बघता मुलं मोठी कधी होतात कळतंच नाही, असं म्हणत त्यांनी ईशानने त्याची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे, अशी माहितीदेखील दिली आहे. अमेय यांनी पत्नी व मुलाबरोबरचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, “बघता बघता मुलं मोठी कधी होतात कळतच नाही. आज आमचा ईशान १८ वर्षांचा झाला. वयानी मोठा झालाच पण समजुतीनी मोठा झाला हे खूपच आनंद देणारं. या क्षेत्रात करिअर करायचं तर केवळ माझ्या ओळखीने नाही, तर प्रचंड कष्ट करून स्वतःची ओळख निर्माण करायला हवी हे या वयात कळणारा ईशान बघून मला आणि स्वतीला खूप बरं वाटतं”.
आणखी वाचा – मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी…”
यापुढे त्यांनी गंमतीत “१८ व्या वर्षी मी काय करत होतो हे कृपया मला विचारू नये” असं म्हणत “आज पहाटे ५ वाजता उठून शुटींगला गेला आहे. असिस्टंट डायरेक्टर (सहाय्यक दिग्दर्शक) म्हणून त्याचं हे पहिलं काम आहे आणि तो ते मनापासून करत आहे याचा आनंद आहे” यापुढे त्यांनी “एक दिवस आम्हाला तुझं नाव डायरेक्टर (दिग्दर्शक) म्हणून (किंवा ॲक्टर, एडिटर म्हणून) दिसू देत अशा त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, अमेय खोपकर व स्वाती खोपकर यांचा मुलगा ईशान हा १८ वर्षांचा झाला असून असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली असल्याची माहिती अमेय यांनी या खास पोस्टद्वारे दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्यांनी त्याला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अमेय यांच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे इशानला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदनही केले आहे.