मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 16, 2024 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Elvish Yadav apologizes with youtube video for hug to munawar faruqui see the details

मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी...”

प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता झाल्यापसून चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. गेले काही दिवस त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर, यूट्यूबरशी भांडण केल्याबद्दल त्याच्याबद्दल सोशल मीडियासह याने माध्यमांत चर्चा होताना पाहायला मिळत आहेत.

अशातच नुकतेच एल्विशने मुनव्वर फारुकीला मिठी मारली होती, ज्यामुळे तो त्याच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. एल्विशने नुकतीच मुनव्वरची भेट घेतली. यावेळी त्याने मुनव्वरला मिठी मारल्यामुळे एल्विशच्या अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे प्रकरण इतके वाढले की, एल्विशला कॅमेऱ्यासमोर येऊन हात जोडून त्याच्या चाहत्यांची माफी मागावी लागली. एल्विशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. 

View this post on Instagram

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असणार?

यावेळी त्याने असं म्हटलं की, “जेव्हापासून मुनव्वर फारुकीबरोबर माझा फोटो व्हायरल झाला आहे, तेव्हापासून माझ्या खऱ्या हिंदू असण्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकेच नव्हे तर मला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. त्यामुळे या व्हिडीओद्वारे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझ्या सनातन धर्मासाठी एक नव्हे, तर असे हजारो मुनव्वर फारुकींचे कुर्बान आहेत. मी त्याला माझा कुणी मित्र किंवा भाऊ वगैरे मानत नाही. माझ्यासाठी माझा धर्म महत्त्वाचा आहे”.

आणखी वाचा – ‘मराठी पाऊल पडते पुढे’! पुरस्कार मिळताच प्रिया बापट भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “महाराष्ट्राला अभिमान वाटणं…”

दरम्यान, बॉलीवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटींच्या अलीकडेच झालेल्या ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’मध्ये एल्विश व मुनव्वर यांनीही सहभाग घेतला होता. या खेळादरम्यान दोघांचे एकत्र अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. यानंतर, एल्विश खरा हिंदू असल्याबद्दल त्याच्या चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर एल्विशने एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

Tags: Bollywood entertainment newselvish yadavMunawwar Farooqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Akshay kumar on indian government

प्रत्येक संकटांमधून अमेरिका नाही तर भारतच सगळ्यांना वाचवणार, अक्षय कुमारची सरकारकडे महत्त्वाची मागणी, म्हणाला, "आतंकवादी हल्ला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.