Chal Bhava Citit Show Home Tour : ‘झी मराठी’ वाहिनीवर नव्यानेच भेटीला आलेल्या ‘चल भावा सिटीत’ या रिऍलिटी शोची जोरदार चर्चा सुरु असलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या शोमध्ये शहरातील काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर व काही अभिनेत्री अशा १३ मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. तर गावात राहणारी शेती व इतर व्यवसाय करणारी १२ मुले यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोमध्ये मुलींना ‘सिटी सुंदरी’ तर मुलांना ‘गावरान ब्रो’ अशी नाव दिली आहेत. एकूणच प्रोमो पाहून या रिऍलिटी शोचा एकूणच अंदाज आला आहे. प्रोमो पाहून तर आता सिटीत गाव नेमका कोणता राडा करणार याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
या शोचे नवे स्पर्धक ज्या घरात राहणार तो महल खरंच खूप आलिशान आहे. आणि याची झलक ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतेय. या महलाच्या दरवाज्यात असलेलं कार्ड टॅप केल्याशिवाय घरात कोणालाच एंट्री नाही. आलिशान, भव्य, पांढरा शुभ्र असा हा महल अनेकांच्या भुवया उंचावतोय. घरात एंट्री करताच आपल्याला फाऊंटनएरिया पाहायला मिळतो. शिवाय आजूबाजूच्या भिंतीवरही हिरवंगार असं गवत पाहायला मिळत आहे. घरात मुलींसाठी आणि मुलांसाठी दोन वेगवेगळ्या खोल्या आहेत.
आणखी वाचा – नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स, सेलिब्रिटींचा आनंदही गगनात मावेना, आर.माधवन म्हणाले…
मुलींच्या खोलीतील ड्रेसिंग रुमने या रुमची शोभा वाढविली आहे. तर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेले बेड या खोलीत पाहायला मिळत आहेत. शिवाय लहान शोभेच्या झाडांनी आणि हटके पेंटिंगने ही खोली सुशोभित केली आहे. तर मुलांच्या खोलीत पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेले बेड दिसत आहेत. तर या घरातील प्रत्येक सदस्याला एकत्रित आणण्यासाठी असलेला लिव्हिंग एरिया अधिकच आलिशान आहे.
आणखी वाचा – हिंदू असूनही एआर रेहमान यांनी मुस्लिम धर्म का स्वीकारला?, ‘त्या’ एका कारणामुळे मोठा निर्णय घेतला अन्…
या अवाढव्य लिव्हिंग एरियामधील आकारस्क सोफे, खिडक्या, पडदे, शोभेच्या वस्तू अधिकच उठून दिसत आहेत. आणि काही खास पेंटिंग्सने या घराची शोभा अधिक वाढवली आहे. डायनिंग टेबल आणि त्यावरील गोल्डन चमचे आणि खास प्लेट अधिकच लक्षवेधी आहेत. तर स्वयंपाकघराने हे घर परिपूर्ण झालेलं आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा येथे उपलब्ध आहेत.