राष्ट्रीय पुरस्कार विजेती आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच पुन्हा एकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रणबीर कपूरबरोबर लग्न केल्यानंतर तसेच मुलीच्या जन्मानंतर तिने विशेष प्रसिद्धी मिळवली. तिने त्यांच्या लग्नातील खास क्षण शेअर केले मात्र अद्याप तिने तिच्या लेकीचा चेहरा कधीच जगाला दाखवला नाही. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलेपणाने भाष्य केले आहे. (Alia Bhatt On Her Daughter)
‘हिंदुस्थान टाइम्स’च्या लीडरशीप समिट २०२३ या कार्यक्रमात आलिया सहभागी झाली होती. यावेळी तिने मुलीचा चेहरा का दाखवला नाही याबाबत सांगितले. राहाला मीडियाच्या लाइमलाईटपासून का दूर ठेवलं आहे याबाबत आलियाने स्पष्टीकरण दिलं. आलिया म्हणाली, ‘मी माझ्या मुलीला लपवत आहे असे कोणालाही वाटू नये, असे मला वाटते. मला माझ्या मुलीवर खूप गर्व आहे. सुरुवातीलाच आम्ही राहाचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. कारण आम्ही नवे पालक होतो आणि ती एक वर्षाची देखील नव्हती. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावा, असं आम्हाला वाटतं नाही.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘राहाला सध्या पापाराझींची गरज नाही. ती अजूनही खूप लहान आहे. आम्ही राहाचा चेहरा कोणालाच दाखवत नाही, असं अजिबात नाही. पण जेव्हा आम्हाला वाटले ही वेळ योग्य आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. तेव्हा आम्ही राहाची पहिली झलक दाखवू. ही गोष्टी आता कधी ही घडू शकते, लवकरच होऊ शकते. आम्ही ज्यावेळेस तयार होऊ, त्यावेळेस आम्ही आवश्य तिची पहिली झलक दाखवू.
याशिवाय आलिया भट्टनेही सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली. आलिया म्हणाली की, “तिच्याबद्दल किंवा तिच्या प्रियजनांबद्दल वाचलेल्या वाईट गोष्टींबद्दल तिला वाईट वाटते, परंतु ती तिच्या प्रेक्षकांशी कधीही भांडणार नाही. ‘जोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.’