Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये नेमकं काय सुरु आहे भाऊ? हा कौटुंबिक कार्यक्रम आहे की, निब्बा-निब्बी शो?, ब्लँकेटखाली नक्की काय सुरु आहे? समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी असे अनेक सवाल करत ‘बिग बॉस’ला चांगलंच धारेवर धरलं आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही लाज वाटेल. दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
सलमान खान नेहमीच ‘बिग बॉस’ हा कौटुंबिक शो आहे असं सांगताना दिसतो. “हा एक कौटुंबिक शो राहील याची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि कोणत्याही स्पर्धकाने मर्यादा ओलांडू नये किंवा गैरवर्तन करू नये” असंही सांगण्यात आलं होतं. पण आता ‘बिग बॉस १७’ मध्ये सध्या खेळ कमी आणि रोमान्स जास्त पाहायला मिळतोय. कधी नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, तर कधी गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंडमध्ये वाद झालेले दिसतात.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 4, 2023
‘बिग बॉस’च्या घरात जेव्हापासून समर्थ जुरेलची एंट्री झाली आहे तेव्हापासून घरातील वातावरण बिघडलेलं पाहायला मिळतंय. समर्थ येईपर्यंत ईशा अभिषेक कुमारच्या अवतीभोवती फिरताना दिसली. पण जेव्हा समर्थने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हा सुरुवातीला तिने त्याला प्रियकर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. मात्र नंतर तिने समर्थ हा तिचा प्रियकर असल्याची कबुली दिली. त्यानंतर समर्थ व ईशा एकत्र राहू लागले आणि त्यांचा रोमान्सही सुरू झाला. पण आता हा रोमान्स त्यांना भारी पडला आहे. समर्थ व ईशा मर्यादा ओलांडत आहेत, हे व्हायरल व्हिडिओ पाहून स्पष्टपणे दिसून येत आहे.
नुकताच ईशा व समर्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये घरातील सर्वजण झोपलेले असून ईशा-समर्थ ब्लँकेटच्या आत रोमान्स करत असल्याचे दिसत आहे. असाच आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये समर्थ आणि ईशा लिव्हिंग एरियामध्ये सोफ्यावर बसलेले आहेत. त्यावेळी समर्थ अश्लील कृत्य करताना दिसत आहे, त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप दर्शविला आहे.