बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेली अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून पदार्पण करणारी आलियाने अनेक चित्रपट केले असून लवकरच ती हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. दीड वर्षांपूर्वी आलियाने रणबीर कपूरशी लग्न केलं असून दोघांना ‘राहा’ नावाची मुलगी आहे. (Alia Bhatt first boyfriend)
मात्र लग्नाआधी आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्रापासून अनेकांशी जोडले गेले. त्यातलंच एक नाव आलियासोबत जोडलेलं होतं, ते म्हणजे अली दादरकर. जो आलियाचा पहिला बॉयफ्रेंड होता. आलिया आपल्या करिअरला सुरुवात करण्यापूर्वी अलीला डेट करत होती. विशेष म्हणजे, आलिया भट्ट आणि अली दादरकर हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.
मात्र, बॉलीवूड पदार्पणानंतर आलिया आणि अलीमध्ये अंतर झाले आणि तेच नंतर ब्रेकअपचे कारण बनले. शिवाय हेदेखील म्हटले जात आहे की, सिद्धार्थ मल्होत्रामुळे या दोघांचे ब्रेकअप झाले. पुढे या चित्रपटानंतर आलियाची सिद्धार्थ मल्होत्रासोबतची जवळीक वाढली होती. मात्र त्यानंतर हे दोघे वेगळे झाले.
हे देखील वाचा – …आणि तेव्हा अमीषा पटेलला आई-वडिलांनी चपलीने मारलं, कोर्टापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण

हे देखील वाचा – ‘पुष्पा २’ चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित!
आलियाचा एक्स बॉयफ्रेंड अली दादरकरचा मुंबईत झाला असून त्याने जमनाबाई नर्सी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे तो उच्चशिक्षणासाठी ब्रिटनमध्ये निघून गेला. सध्या अली दादरकर मेकॅनिकल इंजिनीअर असून काही वर्ष तो दुबईत वास्तव्यास होता. तर आलियाला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ नंतर तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. (Alia Bhatt first boyfriend)