दाक्षिण्यात अभिनेता अल्लू अर्जुनचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’. चित्रपटातील गाणी, डायलॉग्स, अभिनय सर्वांचं जगभर कौतुक झालं. चित्रपटातील अल्लू अर्जुन व्यतिरिक्त अन्य कलाकारांनी भारदस्त अभिनय करून चित्रपटाच्या यशामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. अल्लू अर्जुन सोबत या चित्रपटात अभिनेत्री रश्मीका मंदानादेखील झळकली होती. शिवाय अल्लू अर्जुनच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेता फहाद फासील झळकला होता. जगभरात चित्रपटाने कमाई केल्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना आतुरता लागून राहिली होती.(Pushpa 2 New Poster)
काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली सोबतच चित्रपटाचा ट्रेलर देखील लाँच करण्यात आला होता. ‘पुष्पा २’ या चित्रपटाची वाट बघत असलेल्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आहे. आज अभिनेता फहाद फासीलच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा २ मधील त्याचा एक लूक प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याच्या या लूकच सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे.(fahad fasil)
पुष्पा या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज आणि अभिनेत्री रश्मिका मंधानाचा रोमँटिक लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. चित्रपट समीक्षकांच्या मते चित्रपटाचं कथानक सुद्धा बॉक्स ऑफीसा वर गल्ला जमवण्या इतकं दमदार नक्की होत. चित्रपटातील अनेक ठिकाणी केलेलं शूट, गाणी या सगळ्यांचीच प्रेकांच्या मनात घर केलं आहे. पुष्पा मधील सामी सामी हे गाणं आणि त्यावरील रश्मिका हुक स्टेप चांगलीच चर्चेत ठरली आहे. अनेक रील सुद्दा त्या गाण्यावर व्हायरल होताना दिसले.(pushpa 2 trailer)