‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. अक्षया कायम चाहत्यांसोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते. तर सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. आ अशातच अक्षयाच्या एका पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. (akshaya naik)
पहा अक्षयाने काय सुरु केलं नवीन (akshaya naik)
इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर करत अक्षयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यांत तिने एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने फोटोसोबत घरगुती जेवण करणाऱ्या वस्तूंचा समावेश केला आहे. आणि नवीन प्रोजेक्टची माहिती असे कॅप्शन दिले आहे. अक्षयाची ही पोस्ट पाहून नक्की काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या प्रश्नाला पूर्णविराम देत अखेर या फोटोमागचे गुपित समोर आले आहे.

अक्षयाने नवीन कॅटरिंगचा व्यवसाय सुरु केला आहे. कल्चर किचन या नावाने हा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या व्यवसायातून नवं फूड वेंचर अक्षयाने सुरु केलं आहे. घरातील छोट्या get-together पासून Birthday partyपासून ते लग्न सोहळ्यातील functions पर्यंत सर्व catering requirements अक्षयाच्या या कल्चर किचन मध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. अक्षयाच्या या नव्या इनिंगला नेटकाऱ्यानी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.(akshaya naik)
====
हे देखील वाचा – अक्षया-हार्दिकचा पहिला गुढीपाडवा,पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
====
अक्षयाने मराठी मालिकांसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे अक्षयाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेत अक्षयाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील भूमिकेनेही रसिकांना भुरळ पाडली. अक्षयाच्या फोटोशूटचीही सर्वत्र चर्चा असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. अक्षयाच्या नव्या व्हेंचरसाठी इट्स मज्जा कडून तिला खूप खूप शुभेच्छा.
