बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयाने सतत चर्चेत असतो.सध्या तो बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण वेळात वेळ काढून तो सामाजिक कार्यही करत असतो. नुकताच त्याने राजस्थानमधील एका मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली होती. तसेच त्या वसतीगृहासाठी 1 कोटी रुपयांचे दानही केले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच त्याने एका मुलाखतीमध्ये भगवान शंकराच्या आराधनेबद्दल व्यक्त झाला आहे. (Akshay kumar on Mahashivratri)
अक्षय हा ‘ओएमजी 2′ या चित्रपटातून भगवान शंकराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचा ‘शंभू’ हा म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षयने त्याचा आवाजाही दिला आहे.भगवान शंकराबरोबर नातं इतकं घट्ट कसं झालं याबद्दल त्याने खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, “माझ्या आईच्या निधनानंतर मी भगवान शंकराच्या अधिक जवळ गेलो. त्यांच्यामुळे माझ्या मनाला शांती मिळते आणि मला हे समजते की मृत्यूबरोबरच एक नवीन जन्मही होत असतो. मृत जीव हे यिन व यांगच्या रुपात जीवीत असतात. अंधाराशिवाय उजेड नाही आणि उजेडाशिवाय अंधारही नाही. ‘OMG 2’ हा चित्रपट अगदी योग्य वेळी माझ्याकडे आला. हा देवाचाच एक संदेश होता”.
पुढे तो म्हणाला की, “मला भगवान शंकराची तेव्हा गरज होती जेव्हा मला त्यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करताना भगवान शंकराची गाणी ऐकतो. मला त्यांचे अस्तित्त्व समजते. मला उद्या जे होणार आहे त्यावर विश्वास आहे. कारण मला माहीत आहे माझे नशीब ही भगवान शंकरच लिहितील”.
‘OMG 2’ च्या चित्रीकरणादरम्यान भगवान शंकरांच्या भक्तीची महिमा लक्षात आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाण्याची संधी मिळाल्याचे अक्षयने सांगितले. त्याने सांगितले की, “महादेवाची नगरी उज्जैनची ओळख ‘OMG 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने झाली. तिथे प्रत्येकजण हर हर महादेव,हर हर महाकाल असं बोलूनच एकमेकांना भेटत असत. महादेवच सर्वकाही आहेत. जे आहे ते त्यांच्यामध्येच आपल्याला मिळणार आहे”, असं बोलताना अक्षय अतिशय भावुक झाला होता.