भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीचा शाही सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नाआधीच्या कार्यक्रमाचे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. १ ते ३ मार्च दरम्यान झालेल्या या लग्न सोहळ्यामध्ये बॉलिवूडकरांनी आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये हॉलिवूड पॉपस्टार रिहानापासून सर्वांनीच परफॉर्मन्स सादर केले. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान व अंबानींची होणारी सून राधिकाचा जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Actor shahrukh khan dance with Radhika merchant)
अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमामध्ये खुद्द मुकेश अंबानी,नीता अंबानी यांनी रोमॅंटिक डान्स सादर केला. त्यांच्या परफॉर्मन्सचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासह आकाश अंबानी व श्लोका मेहता यांनीही ‘केसरिया’ या गाण्यावर डान्स केला. मुलगी ईशा अंबानी व नीता अंबानी या मायलेकींनीही ‘ घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच बॉलिवूडमधील अनेक गायकांनीही आपल्या गायनाने सर्वच मंत्रमुग्ध झाले आणि नाचायलाही भाग पाडलं. अशातच शाहरुख खान अशातच शाहरुख राधिकाबरोबर ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर डान्स करताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राधिका व शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “राधिका ही जगातली भाग्यवान मुलगी आहे”, दूसरा नेटकरी म्हणतो की, “राधिक खूप गोड आहे”, तिसरा नेटकरी लिहितो की, “राधिका अगदी लहान मुलाप्रमाणे नाचत आहे”.
अनंत व राधिकाच्या या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर यांनीही उपस्थिती दर्शवली होती. अनंत व राधिकाचे लग्न यावर्षी १२ जुलै रोजी पार पडणार आहे.