आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एरव्ही तिच्या कपडे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी यावेळेस मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने गुपचूप साखरपुडा उरकला असून तिचा होणारा पती कोण? हे मात्र समोर आले नाही. (Urfi Javed got engaged)
अभिनेत्री उर्फी जावेद जितकी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तितकीच तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकली आहे. एरव्ही वादग्रस्त वक्तव्ये करणारी उर्फी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल फारसं बोलणे टाळते. मात्र, आता उर्फीने साखरपुडा उरकला असून त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – Video : महाराष्ट्र शासनाकडून रौप्य पदक देत निवेदिता सराफ यांचा सन्मान, म्हणाल्या, “हा सन्मान माझा नसून…”
समोर आलेल्या फोटोजमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा सलवार परिधान केला असून ती एका व्यक्तीसह पूजा करताना दिसत आहे. त्याचबरोबर ती त्या व्यक्तीच्या बोटात अंगठी घालताना दिसली. हिंदू रीती-रिवाजानुसार अभिनेत्रीच्या घरी हा साखरपुडा पार पडताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या डोक्यावर ओढणी घेतली. मात्र, या सर्व फोटोंमध्ये तिच्या भावी पतीचा चेहरा झाकला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा मिस्ट्री मॅन कोण? याबाबतची चर्चा सध्या रंगत आहे.
हे देखील वाचा – Raavsaaheb Teaser : “देशाची सिस्टीम बिघडली की…”, ‘रावसाहेब’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, मराठीतील टॉप अभिनेत्रींची अंगावर काटा आणणारी झलक
दरम्यान, तिच्या साखरपुड्याची फोटोज व्हायरल होताच चाहते व नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. शिवाय, उर्फीच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हे फोटोज सोशल मीडियावर समोर आले असले. तरी अभिनेत्रीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.