अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयामुळे आणि धमकेदार ॲक्शनमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच तो त्याच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.या चित्रपटामध्ये तो अभिनेता टायगर श्रॉफबरोबर ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊ येथे गेले असता प्रेक्षकांकडून गैरवर्तन झाले तसेच मंचावर उभ्या असलेल्या अक्षय व टायगर यांच्यावर चप्पल तसेच इतर वस्तुही फेकून मारण्यात आल्या. दरम्यान पोलिसांना उपस्थितांवर लाठीचार्ज करावा लागला होता. अशातच आता अक्षयने भारत सरकारकडे एक मागणी केली आहे. (Akshay kumar on indian government)
अक्षय व टायगर हे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४’ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तेव्हा त्यांना चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये एक प्रश्न विचारला गेला की, “अमेरिकेत जे बॉडी डबल्स असतात किंवा ॲक्शन करतात त्यांना खूप प्रसिद्धी मिळते. अनेक पुरस्कारही मिळतात. त्यांना त्यांचे सरकारही प्रसिद्धी देत असतात. या चित्रपटांमध्ये असलेली भावना व चैतन्य भारतात आणण्याची गरज आहे का?”.
त्यावर अक्षयने उत्तर दिलं की, “हो नक्कीच. आपण लहानपणापासून असे चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे जर कधी आतंकवादी हल्ला झाला तर त्यापासून अमेरिकाच आपले संरक्षण करेल असं आपल्याला वाटत आहे. कारण आपण हॉलीवूड चित्रपट पाहत आले आहोत. जर एलियन्स आले तर आपल्याला कोण वाचवणार तर अमेरिकाच वाचवेल असा आपला समज आहे. कुठूनही कसाही अटॅक झाला तरीही एकच उत्तर म्हणजे अमेरिका”.
पुढे तो म्हणाला की,“मला ही गोष्ट बदलायची गरज आहे. जर काही असेल तर आता भारत वाचवेल. मी सरकारला विनंती करतो की आम्हालाही अशी संधी द्यावी. आपले हवाई दल आहे, आर्मी आहे त्यांच्याकडून खूप काही मिळत आहे. पण आपल्याला अजून गरज आहे. मलाही वाटत की जर कधीही काहीही झालं तर आपल्याला भारतच वाचवेल”.
अक्षय व टायगर यांचा ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक VFX चा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जॉर्डन, ग्लासगो, स्कॉटलँड, अबू धाबी येथे झाले आहे.