‘पुष्पाः द राइज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आणि आता या चित्रपटाचा दूसरा भाग ‘पुष्पाः द रुल’ हा या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रुल’ अखेर ०५ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तुम्हाला २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’ मधील समंथा प्रभूचे ‘ओ अंतवा’ हे गाणं आठवत असेल. या गाण्याने सर्वत्र खळबळ माजवली होती आणि त्याचा प्रभाव आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. (Allu Arjun Pushpa The Rule Movie)
‘पुष्पा १’ प्रमाणेच ‘पुष्पा २’मध्येही असं गाणं असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या गाण्यासाठी जान्हवी कपूरपासून ते श्रद्धा कपूरपर्यंतची नावे समोर आली आहेत. पण आता माहिती अशी आहे की, हे गाणे श्रीलीलाला मिळालं आहे. ‘स्त्री २’चित्रपटाला मिळालेल्या यशाचा विचार करता, निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ मधील आयटम डान्ससाठी श्रद्धा कपूरशी संपर्क साधला आहे. पण आता असे बोलले जात आहे की तेथे काही काम झाले नाही. अशा परिस्थितीत सुंदर अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना श्रीलीलाचे सौंदर्य आता अल्लू अर्जुनबरोबर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
‘डेक्कन क्रॉनिकल’नुसार निर्मात्यांनी ‘पुष्पा द रुल’ मधील एका खास गाण्यासाठी श्रीलीलाची निवड केली आहे. कारण ती खूप चांगली नृत्यांगना आहे. श्रीलीला दक्षिण चित्रपटसृष्टीत आपल्या डान्ससाठी ओळखली जाते. ‘गुंटूर करम’ चित्रपटातील महेश बाबूबरोबरच्या तिच्या नृत्याने टॉलिवूडला वेड लावले होते ‘धमाका’ चित्रपटातील ‘पल्सर बाइक’ आणि ‘झिंथक’ सारख्या गाण्यांवर तिच्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर ‘गुंटूर करम’मधील महेश बाबूबरोबरच्या ‘कुरीची मदथापेटी’ या गाण्याने खळबळ उडवून दिली. अशातच आता श्रीलीला लवकरच ‘पुष्पा २’मधील आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावणार आहे.
आणखी वाचा – Video : भाचीबरोबर विशाखा सुभेदारांचा बेभान होऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण, कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी यापूर्वीही श्रीलीलाशी संपर्क साधला होता. यासाठी अभिनेत्रीने २ कोटी रुपये फी मागितल्याचे समजते. त्यानंतर बातमी आली की निर्मात्यांनी तृप्ती डिमरी, जान्हवी कपूर आणि श्रद्धा कपूर यांसारख्या बॉलीवूडमधील बड्या स्टार्सशी संपर्क साधला. मात्र, या सर्व अफवा असल्याचेही म्हटले आहे. प्रॉडक्शन हाऊसने असा कोणताही प्रयत्न केला नाही.