बॉलिवूडमधील राजबिंडा अभिनेता म्हणून हृतिक रोशनचे नाव सहज ओठांवर येते. २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. हृतिकचे वडील राकेश रोशन हे बॉलिवूडमधील यशस्वी निर्मात्यांपैकी एक. त्यांनी हृतिकला चित्रपटसृष्टीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी राकेश यांनी घरातील फर्निचरचीही विक्री केली होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांतच राकेश यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याबद्दलचा खुलासा स्वतः हृतिकने केला आहे. (Hrithik roshan on rakesh roshan)
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला भरघोस यश मिळाले. यामध्ये हृतिकबरोबर अमीषा प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आली होती. आमिष व हृतिकचा हा पहिला चित्रपट होता. वडिलांवर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले की, “१९९९ साली त्यांनी मला चित्रपट सृष्टीमध्ये आणायचे होते तेव्हा चित्रपटाच्या फंडिंगसाठी ते कर्जबाजारी झाले. त्यांनी घरातील फर्निचरदेखील विकले होते. सर्व कुटुंबीयांना फरशीवर झोपावे लागत असे. पण या सर्व संघर्षाचा फायदा झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो सुपरहिट झाला होता. पण काही आठवड्यातच त्यांना गोळ्या मारण्यात आल्या”.
तो पुढे म्हणाला की, “गँगस्टर अली बाबा बुदेशच्या माणसांनी वडिलांच्या ऑफिसच्या जवळ गोळ्या मारल्या होत्या. एक गोळी त्यांना छातीमध्ये लागली तर दुसरी गोली त्यांच्या हाताला लागली. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला झालेल्या फायद्यातील हिस्सा ते मागत होते. ते देण्यासाठी वडिलांनी नकार दिला. या रागामध्ये त्यांनी वाडिलांवर गोळ्या झाडल्या. काही आठवड्यानंतर ते घरी परतले”.
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी २००३ साली दिग्दर्शक म्हणून ‘कोई मिल गया’ या चित्रपटाची धुरा त्यांनी सांभाळली. हा चित्रपट देखील खूप हिट झाला. यामध्ये हृतिकबरोबर प्रीती झिंटा प्रमुख भूमिकेत होती. त्यानंतर या चित्रपटाचा पुढील भाग ‘क्रिश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. यानंतर ‘क्रिश ३’ देखील प्रदर्शित करण्यात आला. आता प्रेक्षक ‘क्रिश ४’ ची आतुरतेने वाट पाहत आहे.