शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाचं कार अपघातात निधन, १८ वर्षीय मुलाचा मित्रामुळे गेला जीव, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 27, 2024 | 3:23 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ajay Devgan starrer Son of Sardaar movie director Ashwini Dhir 18 year old son of died in a car accident.

'सन ऑफ सरदार'चे दिग्दर्शकाच्या मुलाचं कार अपघातात निधन, १८ वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

अजय देवगण स्टारर ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’च्या दिग्दर्शिका अश्विनी धीर यांचा १८ वर्षीय मुलगा जलज धीर याचा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत एका कार अपघातात मृत्यू झाला. विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर त्यांची कार दुभाजकाला धडकली तेव्हा तो त्याच्या तीन मित्रांसह कारमध्ये होता. जलजचा मित्र साहिल मेंढा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. ज्यामुळे ही दु:खद घटना घडली. (Ashwini Dhir 18 year Old Son Jalaj Dhir Dies)

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, जलज आपल्या काही मित्रांबरोबर रात्री उशिरा वांद्रे ते गोरेगावला निघाले होते. त्यापैकी एक, १८ वर्षीय साहिल मेंढा कार चालवत होता आणि तो दारूच्या नशेत होता. सहारा स्टार हॉटेलजवळ मेंढा यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट सर्व्हिस रोड आणि उत्तरेकडील पुलाच्या दरम्यान असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जलज आणि त्याचा दुसरा मित्र सार्थ कौशिक यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराने उधळला सासूच्या लग्नाचा डाव, भुवनेश्वरीने हात जोडत मागितली माफी, चारुहास-अधिपती माफ करणार का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलज त्याच्या मित्रांसह घरी उपस्थित होता. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तो आपल्या तीन मित्रांसोबत व्हिडिओ गेम खेळत होता. यानंतर सर्व मित्रांनी अचानक ड्राईव्हला जाण्याचा बेत आखला. त्यांनी जलज यांच्या घरातून गाडी घेतली आणि आधी मुंबईतील वांद्रे भागात जेवणासाठी थांबले. यानंतर पहाटे ४.१० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत असताना साहिलचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला.

आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”

दरम्यान, मुलाच्या निधनामुळे सध्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी धीर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांचे लेखन आणि निर्मितीही केली आहे. त्यांनी ‘वन टू थ्री’, ‘अति तुम कब जाओगे?’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि निर्मिती केली आहे. 

Tags: Ashwini Dhir 18 year old son Jalaj Dhir diesAshwini Dhir 18 year old son Jalaj Dhir dies in car accident
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
arjun kapoor on ex-girlfriend

मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने एक्स गर्लफ्रेंडला केला मेसेज, म्हणाला, “हो, मी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.