ऐश्वर्या राय-बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मिस वर्ल्डचा ‘किताब जिंकल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनेत्रीच्या मोहक हास्याने व दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांना घायाळ करून सोडलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ऐश्वर्याला बरीच ओळख मिळाली आहे. तिच्या लोकप्रियतेला सीमा नाही. ऐश्वर्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक प्रमुख ब्रँडचा चेहरा आहे. (Aishwarya Rai News)
सियासतने शेअर केलेल्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. अनेक प्रकल्प व ब्रँड एंडोर्समेंटसह, ऐश्वर्याची एकूण संपत्ती रु. ८०० कोटी आहे. तिच्या पाठोपाठ प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर व नयनतारा या कलाकारांचा समावेश आहे.
एका Reddit युजरने सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्रींची यादी शेअर केली आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या ऑफ शोर अकाउंटबाबत सांगण्यात आलं आहे. हे अकाउंट बिजनेस, एमएमआयसी पार्टनर्स लिमिटेडशी संबंधीत आहे. जे २००९ मध्ये बंद करण्यात आलं होतं. कंपनीत ऐश्वर्याशिवाय आणखी दोन व्यक्ती आहेत, यात ऐश्वर्याची आई वृंदा राय व भाऊ आदित्य राय सामिल आहेत.

बच्चन कुळातील कथित वादाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. दरम्यान, टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या व अभिषेक यांच्या वैवाहिक जीवनात अनेक दिवसांपासून अडचणी येत आहेत, परंतु ते त्यांची मुलगी आराध्यासाठी एकत्र आहेत. एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, ऐश्वर्या जलसामधून बाहेर पडली आहे आणि ती तिच्या पती व मुलीसह वेगळ्या ठिकाणी राहत आहे.