शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली ऐश्वर्या राय, संपत्ती ऐकून व्हाल थक्क, अनुष्का-प्रियांकालाही टाकलं मागे अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Rai News

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली ऐश्वर्या राय, संपत्ती ऐकून व्हाल थक्क, अनुष्का-प्रियांकालाही टाकलं मागे अन्…

ऐश्वर्या राय-बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मिस वर्ल्डचा ‘किताब जिंकल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनेत्रीच्या मोहक हास्याने व दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांना घायाळ करून सोडलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ऐश्वर्याला बरीच ओळख मिळाली आहे. तिच्या लोकप्रियतेला सीमा नाही. ऐश्वर्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक प्रमुख ब्रँडचा चेहरा आहे. (Aishwarya Rai News)

सियासतने शेअर केलेल्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. अनेक प्रकल्प व ब्रँड एंडोर्समेंटसह, ऐश्वर्याची एकूण संपत्ती रु. ८०० कोटी आहे. तिच्या पाठोपाठ प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर व नयनतारा या कलाकारांचा समावेश आहे.

आणखी वाचा – लग्नाआधी नवऱ्याला भूतकाळ सांगण्याबाबत पूजा सावंतने केला खुलासा, म्हणाली, “मला त्याला सगळं सांगायचं होतं पण…”

एका Reddit युजरने सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्रींची यादी शेअर केली आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या ऑफ शोर अकाउंटबाबत सांगण्यात आलं आहे. हे अकाउंट बिजनेस, एमएमआयसी पार्टनर्स लिमिटेडशी संबंधीत आहे. जे २००९ मध्ये बंद करण्यात आलं होतं. कंपनीत ऐश्वर्याशिवाय आणखी दोन व्यक्ती आहेत, यात ऐश्वर्याची आई वृंदा राय व भाऊ आदित्य राय सामिल आहेत.

आणखी वाचा – “आपल्या उंचीला आल्या अन्…”, ‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभुलकरने केलेली पोस्ट लक्षवेधी, खास फोटो शेअर करत म्हणाली, “बघता बघता…”

बच्चन कुळातील कथित वादाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. दरम्यान, टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या व अभिषेक यांच्या वैवाहिक जीवनात अनेक दिवसांपासून अडचणी येत आहेत, परंतु ते त्यांची मुलगी आराध्यासाठी एकत्र आहेत. एका सूत्राने पोर्टलला सांगितले की, ऐश्वर्या जलसामधून बाहेर पडली आहे आणि ती तिच्या पती व मुलीसह वेगळ्या ठिकाणी राहत आहे.

Tags: AISHWARYA RAIAishwarya Rai Bachchanaishwarya rai bachchan breaking newsbollywood gossipentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shilpa Tulaskar Answers To Trollers

मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.