Aishwarya Rai Bachchan : माजी मिस वर्ल्ड व बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जगभरात तिचे लाखो दिवाने चाहते आहेत. ऐश्वर्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याने आजवर तिच्या चित्रपटांमध्ये वेळोवेळी अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे आणि या सगळ्यात तिने अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे. ऐश्वर्या रायचे बॉडीगार्ड नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्याबरोबर सावलीसारखी उभे असतात. सेलिब्रिटी बनणे हे नक्कीच एक ग्लॅमरस काम आहे, परंतु त्यासाठी खूप गोपनीयता व सुरक्षितता देखील आवश्यक आहे.
सेलिब्रिटी सामान्य माणसांप्रमाणे मुक्तपणे फिरु शकत नाहीत. आणि ऐश्वर्याचा विचार केला तर तिच्या चाहत्यांमध्ये तिची इतकी क्रेझ आहे की ती शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे. अशा परिस्थितीत ऐश्वर्या जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा तिला अंगरक्षकांच्या संरक्षणात राहावे लागते. अभिनेत्रीच्या अंगरक्षकांपैकी एक शिवराज बराच काळ तिच्याबरोबर आहे. शिवराज हा बॉडीगार्ड गेली अनेक वर्ष ऐश्वर्याचे संरक्षण करत आहेत. नेहमीच ते तिच्याबरोबर फिरताना दिसतात.
आणखी वाचा – वादाला नव्याने सुरुवात, हनी सिंहने रॅपवरुन बादशाहला सुनावलं, म्हणाला, “असे लिरिक्स लिहिले तर माझं नशिब…”
शिवराज यांचा बच्चन कुटुंबाची सुरक्षा करतात आणि विशेषतः ऐश्वर्यासह सावलीसारखे राहतात. पण त्यांना किती पगार मिळतो हे फार कमी जणांना ठाऊक असेल. ऐश्वर्या राय बच्चनचा बॉडीगार्ड शिवराजचा खरा पगार किती आहे हे माहीत नसले तरी, इंडिया डॉट कॉमने सांगितले आहे की, अभिनेत्री तिचा अंगरक्षक शिवराजला दर महिन्याला लाखो रुपये मानधन देते. तर अभिनेत्रीच्या इतर अंगरक्षकांपैकी एक असलेल्या राजेंद्र ढोले यांनाही चांगला पगार मिळतो.
फिल्मीबीटच्या वृत्तानुसार, राजेंद्र ढोले यांचे वेतन पॅकेज वार्षिक 1 करोड रुपये इतके असेल. २०१५ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने तिचा बॉडीगार्ड शिवराजच्या लग्नातही हजेरी लावली होती. यावरुन हे सिद्ध होते की, अभिनेत्रीचे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. रिपोर्ट्सनुसार, शिवराज हे तांत्रिक तज्ञ देखील आहेत. ऐश्वर्याच्या पाठीशी कायम खंबीरपणे असणाऱ्या तिच्या बॉडीगार्डबरोबर तिचा चांगला बॉण्ड आहे.