Yo Yo Honey Singh On Badshah : रॅपर हनी सिंग व बादशाह यांच्यातील भांडण काही नवीन नाही. २००९ पासून या दोघांमधील मतभेदाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र, बादशाहने यापूर्वीच हनी सिंगबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले असताना, रॅपरने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला आहे. आता हनी सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याचा व्हिडीओ शेअर करुन थेट बादशाहला फटकारले आहे. आपल्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ माजवणारा रॅपर व गायक हनी सिंगने नुकतेच त्याच्या ‘कालास्टार’ या नव्या गाण्याने पुनरागमन केले आहे. त्याच्या चाहत्यांनाही हे गाणे खूप आवडले असल्याचं दिसलं. ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसणार आहे.
दुसरीकडे, बादशाह श्रेया घोषाल व विशाल ददलानीसह ‘इंडियन आयडॉल १५’ ला जज करत आहे. हनी सिंग व बादशाहने याआधी एकत्र काम केले आहे. मात्र, २००९ मध्ये बादशाह व हनी सिंगने रॅप ग्रुप माफिया मुंडिर सोडला. नुकतेच बादशाहने सांगितले होते की, त्याला हनी सिंगबरोबर पुन्हा काम करायचे आहे आणि १० वर्षांपासून त्याच्या मनात जपून ठेवलेल्या काही गोष्टी त्याला यापुढे ठेवायच्या नाहीत. हनी सिंगनेही याचा स्वीकार केला नाही. ‘इंडियन आयडॉल १५’ हा सिंगिंग रिॲलिटी शो २६ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
आणखी वाचा – Video : अरमान मलिक मृत्यूच्या दारातून परत, कारचा टायरच फुटला अन्…; दाखवली भीषण परिस्थिती

या शोच्या प्रोमो व्हिडीओमध्ये तिन्ही जज मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बादशाह रॅपिंग करताना दिसत आहे, ज्यामध्ये त्याच्या रॅप लाइन्स ऐकू येत आहेत. हनी सिंगने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून तो शेअर करत त्याने लिहिले की, “असे लिरिक्स लिहायचे आहेत, माझे नशीब उजळेल”. यादरम्यान यो यो हनी सिंगने हसणारा इमोजी देखील शेअर केला आहे. याआधी कोणीही इतके उघडपणे काही बोलले नाही.
नुकतेच हनी सिंगने बादशाहबरोबरच्या त्याच्या प्रदीर्घ भांडणाबद्दल ‘द ललनटॉप’शी चर्चा केली होती. “आपल्याच माणसांबद्दल चीड आहे साहेब, अनोळखी लोकांबद्दल थोडी चीड आहे”, असं तो म्हणाला होता. हनी सिंगने असेही सांगितले की, बादशाह व त्याच्या वडिलांनी इंग्रजी ट्रॅक बनवण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता. शिवाय, त्याने असेही सांगितले की, बादशाहा हा त्यांचा ग्राहक आहे आणि तो रस्त्यावरुन उचलून आणलेला नाही, तर तो एका चांगल्या कुटुंबातील आहे.