मराठी मनोरंजन विश्वातील एक सोज्वळ, सुंदर अभिनेत्री, उद्योजिका, निर्माती, सूत्रसंचालक, कवयित्री अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केलेला आहे. सध्या प्राजक्ता माळी ‘फुलवंती’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची प्राजक्ताने निर्मिती केली असून मुख्य भूमिकेतही आहे. या चित्रपटाच्या माध्यमातूनच प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘फुलवंती’मध्ये प्राजक्ताने निर्मिती केली असून अभिनयही केला आहे आणि तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Prajakta Mali Ukhana Video)
प्राजक्ताचा ‘फुलवंती’ चित्रपट सध्या सर्वत्र महाराष्ट्रात उत्तम प्रतिसादात सुरू आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि या उत्तम प्रतिसादानिमित्त प्राजक्ता प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी चित्रपटगृहांना भेटी देत आहे आणि प्रेक्षकांशी संवाद साधत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायर होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता उखाणा घेत असं म्हणते की, “आकाशात उडतोय पक्षांचा थवा, आकाशात उडतोय पक्षांचा थवा, लग्नाची सगळी तयारी झाली, पण नवरा मुलगा तर मिळायला हवा”. तिच्या या उखाण्यानंतर तिला उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या तरी चित्रपटगृहातील वाटत असून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तिने हा हटके उखाणा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताच्या या उखाण्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “माझा भाऊ आहे, बघ जमत आहे का?”, “मला प्राजक्ता माळीचा सहवास हवा”, “मी आहे बघ तुला चालेल का?” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.