गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अविनाश व ऐश्वर्या विविध रिल व्हिडीओ शेअर करत आहेत. चित्रीकरणामधून वेळ काढत चाहत्यांचं मनोरंजन करणं, स्वतः आनंदी राहणं हा त्यांचा उद्देश आहे. मात्र दोघांच्याही रिल व्हिडीओवरुन त्यांना सध्या ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागत आहे. एखादा डान्स व्हिडीओ, वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला तरीही नेटकरी त्याबाबत नकारात्मक कमेंट करत आहेत. आता या सगळ्या ट्रोलिंगला ऐश्वर्या स्वतः उत्तर देत आहेत.
सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अविनाश व ऐश्वर्या यांना बरंच सुनावण्यात आलं. त्यांच्या वयाबाबत बोललं गेलं. मात्र दोघंही याबाबत अगदी शांत राहिले. मात्र आता ऐश्वर्या यांनी बहुदाला प्रत्येकाला उत्तर द्यायचं ठरवलं आहे. आताही त्यांनी विचित्र भाषेमध्ये व्यक्त होणाऱ्या एका व्यक्तीला चांगलंच सुनावलं आहे. तसेच आपण कोणत्या व्यक्तीबाबत बोलत आहोत याचं भान ठेवा असं ऐश्वर्या यांनी सांगितलं. (Aishwarya narkar angry)
आणखी वाचा – नारकर कपलने डान्स केला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, त्यांना हिणवणारे तुम्ही कोण?
ऐश्वर्या व अविनाश यांच्या विविध लूकमधील एक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांच्या या व्हिडीओचं कौतुक केलं. तर काहींनी त्यांना अगदी वाईट शब्दांमध्ये सुनावलं. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “म्हाताऱ्यालाच लागलाय चळ रिल करताहेत बळं”. ही कमेंट वाचून ऐश्वर्या यांना राग अगदी अनावर झाला. त्यांनी या नेटकऱ्याला खडेबोल सुनावले.
ऐश्वर्या म्हणाल्या, “काय भाषा, काय संस्कार. अशीच कमेंट करण्याइतकी तुमची बुद्धी आहे का?. आपली स्वतःची लायकी काय?. आपण कोणाला काय बोलतो याचं भान ठेवायला आई-वडील कमी पडले. तुम्ही पुण्याचे असूनही असं. यामध्ये तुमचा दोष नाही”. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने ओव्हरस्मार्ट कपल म्हटल्यावर त्यालाही ऐश्वर्या यांनी उत्तर दिलं.