अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे दोघेही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ऐश्वर्या व अविनाश यांनी आपापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. शिवाय सोशल मीडियावरही दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावरील त्यांचा वावर हा तरुणाईलाही लाजवेल असा असतो. तरुण पिढीला मागे टाकत हे कलाकार नवनवीन गोष्टी नेहमीच आकस्मात आणत असतात. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)
सोशल मीडियावरुन ही जोडी नेहमी ट्रेंडिंग रील, गमतीशीर व्हिडीओ, हिंदी, मराठी गाण्यांवर ठेका धरतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. चाहत्यांनाही त्यांचे हे व्हिडीओ विशेष आवडतात. चाहते नारकर कपलच्या या व्हिडिओंला भरभरून प्रतिसादही देताना दिसतात. बरेचदा ही जोडी त्यांच्या या रील हिडिओमुळे ट्रोलिंगलाही सामोरी गेलेली पाहायला मिळाली. दरम्यान ऐश्वर्या यांनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची बोलतीही बंद केली होती.
यानंतर आता ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांच्या एका फोटोने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरुन नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी १९९७ सालचा दोघांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे आणि त्यानंतर २०२४ सालातील आत्ताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मधला फरक त्यांनी या रील व्हिडीओमार्फत दाखवला आहे. नव्वदीच्या काळातला हा फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.
“वर्ष निघून गेलं तरी आपण दोघे अजून फिट आणि हिट आहात”, “आता जास्त तरुण वाटत आहात”, “१९९७ मध्ये छान दिसत आहात एकदम गुटगुटीत”, “आता खूप तरुण वाटत आहात”, अशा कमेंट करत आधीपेक्षा आता जास्त तरुण दिसत असल्याचं सांगत त्याचं कौतुक केलेलं दिसत आहे.