गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्या पतीपासूनही वेगळी होणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री?, लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच नात्यात दुरावा आला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 11, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Second Marriage In Trouble

दुसऱ्या पतीपासूनही वेगळी होणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री?, लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच नात्यात दुरावा आला अन्...

सध्या सिनेसृष्टीत एकीकडे लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असताना काही कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनीही साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर व निखिल पटेल यांच्या लग्नाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी २०२३मध्ये निखिल पटेलशी लग्न केले. दलजीत व निखिल यांच्या संसाराला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं समोर आलं आहे. (Actress Second Marriage In Trouble)

प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर हिने मार्च २०२३मध्ये निखिल पटेलसह मोठ्या थाटामाटात लग्न केले. मेहंदीपासून हळदीपर्यंत आणि त्यानंतर लग्नापर्यंत प्रत्येक क्षणाचा तिने आनंद लुटला. निखिल व दलजीतच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. आता लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे नुकत्याच समोर आलेल्या कृतीवरुन कळत आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले असल्याचं समोर आलं आहे. त्यात आणखी एक नवीन अपडेट आली आहे ज्यामध्ये काही नवीन दावे केले जात आहेत.

आणखी वाचा – वयाच्या २४व्या वर्षी ‘या’ सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने खरेदी केलं अक्षय कुमारचं घर, फोटो शेअर करत दाखवली झलक

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

‘इटाईम्स टीव्ही’शी बोलताना दलजीत कौरच्या जवळच्या सूत्राने निखिल पटेलबरोबरच्या तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. आणि त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले. सूत्राने सांगितले की, सुरुवातीला या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक होते परंतु हा आनंद अल्पकाळ टिकला. सूत्रानुसार, काही वेळातच निखिल आणि दलजीत यांच्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. समस्या वाढल्या, ज्यामुळे दोघांनाही कळले की ते एकमेकांसाठी बनलेले नाहीत.

आणखी वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या नव्वदीतल्या फोटोने वेधलं लक्ष, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “आता खूप…”

गेल्या दोन महिन्यांत परिस्थिती बिकट झाल्याचेही सूत्राने सांगितले. अशा अडचणी कायम राहिल्या तर दलजीत व निखिल लवकरच वेगळे होऊ शकतात. ते घटस्फोट घेऊ शकतात. अद्याप त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला असल्याचं समोर आलेलं नाही. मात्र अभिनेत्रीच्या या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Tags: daljeet kaurdaljeet kaur divorcedaljeet kaur weddingdaljeet kaurr and nikhil patelentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Jau Bai Gavat Finale

मुंबईची मुलगी रमशा फारुकीने पटकावलं 'जाऊ बाई गावात'चं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाले इतके लाख रुपये

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.