मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक अभिनेत्री आहे, ज्यांच्या अभिनयासह सौंदर्याचे चाहते दिवाने बनले आहेत. नवनवीन हटके पोज देत फोटोशूट करून ते सोशल मीडियावरून कायमच शेअर करत असतात. त्यांच्या फोटोशूट्सची नेहमीच चर्चा आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं, ती अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारी प्राजक्ता माळीच्या फोटोशूट्सचे लाखो चाहते दिवाने आहेत. असा एकही दिवस जात नाही, की तिच्या फोटोशूटची चर्चा होत नसते. (Prajakta Mali Instagram Post)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे. मालिका, चित्रपट, वेबसीरिज यामध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तिने केल्या आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटोज व व्हिडिओज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असते. पण सर्वात जास्त चर्चा होते, ती तिच्या फोटोशूट्सची. पारंपरिक असो किंवा आधुनिक लुक, प्राजक्ताच्या प्रत्येक लूक्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
याच फोटोशूटसमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच एक फोटोशूट केलं आहे. पण त्या फोटोजमध्ये तिने असं हटके कॅप्शन दिलं आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. प्राजक्ताने त्या फोटोशूट्समधील काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. ज्यात तिने हटके कॅप्शन देताना म्हटलंय, “Hey sexy lady.. I like your flow.. Your body is banging Out of control… (स्वतःला म्हणत नाहीये, ही माझी रिंगटोन आहे. काही कॅप्शन सुचलं नाही की गाण्याचे लिरिक्स टाकते. तुम्हाला तर माहितीच आहे. आत्ताही काही सूचत नव्हतं)”
हे देखील वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिका निरोप घेणार असल्याने अभिनेत्री रेश्मा शिंदे भावुक, म्हणाली, “ही गोष्ट कायम…”
“विनंती विशेष – आता मराठी गाणं रिंगटोन का नाही? ह्यावर कमेंट्समध्ये चर्चा नको. माझ्या रिंगटोन्स मूडनुसार सतत बदलत असतात. आता ही आहे, इतकंच. कळावे, आपलीच मराठी मूलगी प्राजक्ता माळी” असं प्राजक्ता या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “एवढा टक लावून नक्की फरसाण बघत असणार.”. तर काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या या लूकचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – Jawan Trailer : “बेटे को हाथ लगाने से पहले…”, ‘जवान’मधील शाहरुखचा हा डायलॉग, अन् ‘या’ रिअल लाईफ अधिकाऱ्याची सोशल मीडियावर होत आहे चर्चा
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. लवकरच ती ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात तिच्यासह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे आदी कलाकार झळकणार आहेत. (Prajakta Mali Instagram Post)