भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. ज्यात अनेक हिंदी, दाक्षिणात्य व अन्य भाषिक चित्रपटांनी विविध श्रेणीच्या पुरस्कारांमध्ये आपलं नाव कोरलं आहे. RRR, पुष्पा : द राईझ, गंगुबाई काठियावाडी, सरदार उधम या चित्रपटांचा यंदाच्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक बोलबाला राहिला आहे. (Jitendra Awhad on National Awards)
मात्र, याच राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ला यंदाचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे. तर, अभिनेत्री पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे. एकीकडे काश्मीर फाईल्सला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला असताना दाक्षिणात्य अभिनेता सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे चाहते व अनेक जण नाराज झाले असून सोशल मीडियावर अनेक जण आपली खंत बोलून दाखवत आहे.
हे देखील वाचा – Video : सासूबाईंच्या लग्नात त्यांना जोडवी घालताना मिताली मयेकरला अश्रू अनावर, म्हणाली, “हा क्षण…”
‘जय भीम’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खंत बोलून दाखवली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट करत निवड समितीवर टीका केली आहे. “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. पण ‘जय भीम’ या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील चित्रपट हा ‘जय भीम’ हाच होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे ‘जय भीम’ चित्रपटालाच.”, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
हे देखील वाचा – सचिन पिळगांवकरांनी शेअर केला चंद्रावर बसलेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचा फोटो, नेटकरी म्हणतात, “तुमच्यामुळे आम्हाला…”
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 25, 2023
पण जय भीम या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील…
दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ चित्रपट तमिळनाडूमधील १९९०च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित होता. ज्यात सूर्याने ज्येष्ठ वकील चंद्रू यांची भूमिका साकारली होती. टी.जे. ज्ञानवेल दिग्दर्शित चित्रपटात सूर्यासह लिजोमोल जोस, मणिकंदन, राजिशा विजयन, प्रकाश राज आदी प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाची जगभरात चर्चा झाली असून ऑस्कर अकॅडमीने याची विशेष दखल घेतली होती. (Jai Bhim Movie)