मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर व प्रसिद्ध जोडी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतात. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या या दोघांकडे कुठलेही प्रोजेक्ट्स नसले, तरी ते नेहमी त्यांच्या फिरण्याचे व्हिडिओज शेअर करत असतात. शिवाय, या जोडीच्या फोटोशूट्सची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. मात्र, ही जोडी एका चांगल्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्या आहे. (Mitali Mayekar Instagram Video)
त्यांच्या लग्नाची माहिती सिद्धार्थ व मितालीने सोशल मीडियावर दिल्यानंतर कलाकार मंडळी व चाहत्यांकडून शुभेच्छांचा ओघ सुरु आहे. त्याचबरोबर सिद्धार्थच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले आहे. अशातच मितालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या सासूबाईंच्या पायात जोडवी घालताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मितालीने तिचा हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मितालीच्या सासूबाई सीमा यांनी एक आठवण सांगताना म्हणाल्या, “मितालीच्या लग्नाच्या वेळी मी तिच्या पायात जोडवी घातली होती. आज ती माझ्या पायात जोडवी घालत आहे.” हे सांगताना मितालीला अश्रू अनावर झाले होते. शेअर केलेल्या व्हिडिओसोबत या पोस्टमध्ये मिताली म्हणते, “हा क्षण, ती संध्याकाळ माझ्यासाठी सर्वात आश्चर्यकारक होती.”
हे देखील वाचा – “आम्हाला अशी वागणूक…”, काम करुनही पैसे न दिल्याने गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “लोक असं वागतात तेव्हा…”
मितालीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. शिवाय एका नेटकऱ्याने कमेंट करत करताना म्हटलंय, “खुप छान काम केलंय. आदर्श आहेत दोघे ज्यांनी आईला नवीन आयुष्य दिलं तिलाही हक्क आहे स्वतःचं आयुष्य जगण्याचा… खुप छान 🙏🏻” मितालीच्या या व्हिडिओवर नेटकरी कौतुक करताना दिसत आहे. तसेच तिच्या सासूबाई सीमा चांदेकर यांना या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. (Mitali Mayekar Instagram Video)