बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’ गाण्याचे गीतकार काळाच्या पडद्याआड, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 26, 2023 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dev Kohli Passed Away

‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’ गाण्याचे गीतकार काळाच्या पडद्याआड, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला. आता चित्रपटसृष्टीमधून आणखी एक दुःख बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध गीतकार देव कोहली यांचं आज निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून शारिरीक समस्यांमुळे अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यामध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याचं डॉक्टरांनी देव कोहली यांच्या कुटुंबियांना कळवलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना घरी आणण्यात आलं. अखेरीस त्यांची आजाराशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.

दहा दिवसांपूर्वी देव कोहली यांना रुग्णालयामधून घरी आणण्यात आलं. पण आज सकाळी चार वाजता झोपेत असतानाच देव कोहली यांची प्राणज्योत माळवली. देव कोहली यांच्या निधनानंतर अनेक कलाकार मंडळी दुःख व्यक्त करत आहे. तसेच त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा – Video : “बाबाही गेले अन्…”, आईच्या अंत्यसंस्कारानंतर अजिंक्य देवने जोडले हात, म्हणाला, “आई-बाबांनी नेहमीच…”

देव यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. ‘लाल पत्थर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘बाजीगर’, ‘जुडवा २’, ‘मुसाफिर’, ‘इश्क’, ‘शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘टॅक्सी नंबर ९११’ यांसारख्या १०० हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. इतकंच नव्हे तर सलमान खानचा सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘मैंने प्यार किया’साठी त्यांनी ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘आते-जाते हंसते गाते’, ‘कहे तोसे सजना’ गाणी लिहिली.

आणखी वाचा – Seema Deo Passes Away : ५२वर्षे अभिनेत्री सीमा देव यांनी एकच हिऱ्याचे कानातले वापरले कारण…; स्वतः केला होता खुलासा, म्हणालेल्या, “माझ्यासाठी…”

देव यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये राम लक्ष्मण, अन्नु मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज सारख्या दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. लोखंडवाला येथे त्यांच्या राहत्या घरी दुपारी २ वाजता अंतिम दर्शनासाठी देव कोहली यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. ओशीवरा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Tags: bollywood moviesbollywood newsentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Suvrat Joshi On Taali

"सर्व सीमा ओलांडून…", 'ताली'मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारल्यानंतर सुव्रत जोशीची पोस्ट, म्हणाला, "आयुष्य किती कठोर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.