अभिनेत्री अंकिता लोखंडेने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लोकप्रियेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचे लाखो चाहते दिवाने आहेत. पवित्र रिश्ता या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शोने या अभिनेत्रीने एका उंचीवर नेऊन ठेवलं. या मालिकेमुळेच अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या अंकिता ‘बिग बॉस १७’मुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अंकिताचा प्रवास सर्वांनाच माहित आहे. (Ankita Lokhande post)
‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने पती विकी जैनसह हजेरी लावली होती. यंदाच्या पर्वात विकी व अंकिताची जोडी विशेष चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून ते अगदी संपेपर्यंत अंकिता व विकी यांच्यातील वाद कायम राहिला. त्यांच्या वादामुळे ते चर्चेत आले व बरेचदा ट्रोल होताना दिसले. अंकिता ‘बिग बॉस’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती मात्र चौथ्या क्रमांकावर ती बाद झाली व घराबाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर अंकिता नाराज असलेली पाहायला मिळाली. मीडियासमोरही ती एकही शब्द बोलली नाही.
‘बिग बॉस’ची ट्रॉफी गमावल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा पवित्र रिश्ता मालिकेपासून ते ‘बिग बॉस’च्या घरापर्यंतच्या प्रवासाची झलक शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ती म्हणाली आहे की, “‘पवित्र रिश्ता’ पासून सुरु झालेला प्रवास आता ‘रिश्तोंवाली लडकी’च्या सादरीकरणाने आणखीनच संस्मरणीय झाला आहे. माझ्यासाठी हार व जीत तितकीशी महत्त्वाची नाही कारण मला तुम्हा प्रेक्षकांचा पाठिंबा आहे. आणि तुमच्या प्रेमामुळे मी इथवर पोहोचले आहे”.
पुढे ती म्हणाली आहे की, “अर्थातच चढ-उतार होते. काहीजण माझ्याबरोबर थांबले, काहीजण निघून गेले पण तुम्ही लोक पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा दिल्याबद्दल व माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे खूप खूप आभार. सर्व #AnkuHolics ने केलेल्या प्रयत्नांसाठी व प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द खूपच लहान आहे, पण तुमच्यासाठी एक आभासी झप्पी. सर्वांचे विशेष आभार” असंही ती म्हणाली.