Shiv Veena Troll खऱ्या आयुष्यातील कलाकारांच्या जोड्या कायमच चर्चेत असतात.अशीच ‘मराठी बिग बॉसने बनादी जोडी’ म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांची.बिग बॉसच्या घरात असताना ही जोडी जितकी चर्चेत होती तितकीच बिग बॉसच्या घराबाहेर आल्या नंतर देखील होती.काही दिवसांपूर्वी प्रसाद व अमृताचा साखरपुडा पार पडला.तर १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता व प्रसाद विवाहबंधनात अडकणार आहेत.अमृता, प्रसादने अचानक दिलेल्या या सरप्राइजने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला.(Shiv Veena Troll)
‘बिग बॉस मराठी सीजन ४’ मध्ये अमृता-प्रसाद एकत्र पाहायला मिळाले. परंतु बिग बॉसच्या घरात असताना किंवा घराबाहेर आल्यानंतर देखील प्रसाद अमृताने अधिकृतरीत्या त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. पंरतु ते एकमेकांना डेट करतं आहेत अशी शंका चाहत्यांना होतीच.त्यात थेट साखरपुडा करून त्याचसोबत लग्नाची तारीख घोषित करून फोटो पोस्ट करतं प्रसाद अमृताने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या निमित्ताने प्रसाद व अमृताने खास फोटोशूट देखील केले.त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल देखील झाले.
प्रसाद-अमृताच्या साखरपुड्यानंतर शिव-वीणा झाले ट्रोल (Shiv Veena Troll)
परंतु, प्रसाद,अमृता पूर्वी अशीच बिग बॉसच्या घरातील जोडी चर्चेत होती ती म्हणजे शिव व वीणा यांची.’बिग बॉस मराठी सीजन २’ मध्ये शिव व वीणाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात ही जोडी जमली आणि बिग बॉसच्या घरात असताना त्यांनी एकमेकांना डेट करतं असल्याची कबुली देखील दिली होती.परंतु बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर काही काळाने शिव व वीणा वेगळे झाले.त्याचमुळे प्रसाद,अमृताच्या पोस्टवर ‘नाहीतर शिव,वीणा उगाच त्या बिग बॉस मध्ये असं प्रेम करतं होते की असं कोणाचं नसेल आणि नंतर काय एक दिवस पण बाहेर येऊन टिकलं नाही.’ अशी कमेंट करतं शिव,वीणाला टोला लगावला आहे.
हे देखील वाचा : सचिन पिळगांवकरांनी शेअर केला चंद्रावर बसलेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचा फोटो, नेटकरी म्हणतात, “तुमच्यामुळे आम्हाला…”
बिग बॉसच्या घराबाहेर येऊन प्रसाद अमृताच्या लव्हस्टोरीच लग्नबंधनात रूपांतर होतं असल्याने शिव-वीणा ट्रोल होताना पाहायला मिळतं आहे.पंरतु प्रसाद-अमृता इतकीच शिव-वीणाच्या जोडीला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.