बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी चित्रपटांचं बजेट नसतं असं…”, केतकी माटेगावकरचं मराठी चित्रपटांबाबत वक्तव्य, म्हणाली, “मराठी अभिनेत्री असल्याचा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 26, 2023 | 3:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ketaki Mategaonkar on Marathi Cinema

"मराठी चित्रपटांचं बजेट नसतं असं…", केतकी माटेगावकरचं मराठी चित्रपटांबाबत वक्तव्य, म्हणाली, "मराठी अभिनेत्री असल्याचा…"

आपल्या सुमधुर आवाजाबरोबरच आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे केतकी माटेगावकर. छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या केतकीने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. शिवाय गायनासह अभिनयातही केतकीने आपली वेगळी छाप पाडली आहे. शिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे महाराष्ट्रातील असंख्य तरुणांची क्रश बनली आहे. ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘फुंतरू’ अश्या चित्रपटांमधून दिसलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर आता ‘अंकुश’ या ॲक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात ती रावी परदेशीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Ketaki Mategaonkar)

केतकीच्या या नव्या चित्रपटाचे टीझर व म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला होता. यानिमित्त केतकीने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला आहे. ज्यात तिने अंकुश चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना तिने मराठी चित्रपटांबाबत एक वक्तव्य केलं आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे.

पाहा काय म्हणाली केतकी ? (Ketaki Mategaonkar on Marathi Cinema)

‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना केतकी म्हणाली, “मला या चित्रपटाचा भाग होण्याचा आनंद आहे. मराठी चित्रपटांबद्दल असा समज होता की, मराठी चित्रपटाचं बजेट नसतं. तर हे पूर्णपणे मोडून काढलं असून याचे संपूर्ण श्रेय मी आमच्या चित्रपटाचे निर्माते राजाभाऊ घुले यांना देईन. आमचे दिग्दर्शक निशांत धापसे व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या चित्रपटाला पूर्णपणे न्याय दिला आहे. हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात पाहाल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मराठी चित्रपटाची व्यावसायिकता कितपत वाढली आहे किंवा मराठी चित्रपटामध्ये काय ताकद आहे. म्हणून मला मराठी अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतो.”

हे देखील वाचा – “मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे कारण…”, ‘सुभेदार’ फेम अजय पुरकरांचं मोठं विधान, म्हणाले, “कुठलीही व्यक्ती…”

‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या बिग बजेट ऍक्शनपटाची निर्मिती राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी केली आहे. निशांत धापसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून नामदेव मुरकुटे यांनी कथा लिहिली आहे. केतकीसह नवोदित अभिनेता दीपराज घुले या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अश्या तगड्या स्टारकास्टची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. (Ketaki Mategaonkar on Marathi Cinema)

Tags: ankush new marathi movieketaki mategaonkarKetaki Mategaonkar on Marathi Cinemamarathi cinema
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Smita Deo Emotional Post On Seema Deo

"आम्हा दोघींना वेगळं करणारं…", ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची पहिली पोस्ट, म्हणाली, "त्यांच्या मांडीजवळ बसून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.