‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका गेल्या काही दिवसांपासून रंजक वळणावर आली आहे. मालिकेत रुपालीला विरोचकाने संमोहित करण्याची शक्ती मिळाली असल्याचे कथानक सुरु आहे. त्यामुळे रुपालीने तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वांनाच संमोहित केले असल्याचे सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून या ट्विस्टमध्ये आणखी पुढे काय होणार? याचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नुकतंच मालिकेत रुपालीने फाल्गुनी व केतकी काकू यांना संमोहित केल्यानंतर तिने शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या भागात रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने तन्मय, तेजस, केतकी काकू, फाल्गुनी, शेखर या सर्वांना वश करुन नाचायला सांगते आणि घरतील ही सगळी मंडळी ‘झिंगाट’ या गाण्यावर नाचतानाचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील नेत्रा, अद्वैत कव इंद्राणी हे सोडून सर्वच जण रुपालीच्या संमोहित होण्याच्या शक्तीने तिच्या बाजूने वश झाले आहेत.
अशातच या मालिकेचा नुकतंच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नेत्रा देवीआईसमोर आपलं गाऱ्हाणं मांडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नेत्रा देवी आईसमोर प्रार्थना करताना असं म्हणत आहे की, “सत्य की असत्य?, अर्थात विजय सत्याचाच होणार?” यापुढे नेत्रा देवीआईला उद्देशून “विरोचकाविरुद्धच्या या युद्धात आता तु माझ्याबरोबर आहेस की नाहीस?, मला नाही माहीत. पण या युद्धात मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. सत्यासाठी लढणार आहे. तुझं कार्य पूर्ण करण्याचा मीए प्रयत्न करत राहीन. आता हा माझा राग समज, नाहीतर निश्चय. पण मी आता तुला विचारणार नाही हे ठरवलं आहे.”
त्यामुळे विरोचकाच्या शक्तीविरुद्धच्या लढाईत नेत्रा उतरली आहे. त्यामुळे विरोचकाविरुद्धचे हे युद्ध नेत्रा कसं लढणार?, या युद्धात तिला देवीआईची साथ मिळेल का? विरोचकाविरुद्धच्या या युद्धात नेत्राला यश मिळेल का? आणि राजाध्यक्ष कुटुंबियांना नेत्रा विरोचकाच्या शक्तीतून सोडवू शकेल का/ हे पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.