मध्यंतरी उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे बराच वाद रंगला. उदित यांनी त्यांच्या कॉन्सर्टमध्ये एका महिलेला चक्क किस केलं. ते गाणं गात असतानाच महिला चाहती त्यांना भेटायला आली. स्टेजजवळ येऊन सेल्फी घेऊ लागली. उदित व चाहतीमध्ये इतकी जवळीक झाली की, त्यांनी चक्क किसच केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. उदित यांचं अशाप्रकारचं वागणं अनेकांना खटकलं. सोशल मीडियावर बराच ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. इतकंच काय तर उदित यांच्या कुटुंबालाही यावरुन सुनावलं गेलं. याचबाबत आता उदित यांचा मुलगा आदित्य नारायणने भाष्य केलं आहे. वडिलांच्या व्हायरल व्हिडीओमुळे आदित्यला बरेच प्रश्न विचारले जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. (aditya narayan udit narayan)
नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्यला वडिलांच्या व्हायरल व्हिडीओबाबत विचारण्यात आलं. तेव्हा आदित्य म्हणाला, “वडिलांच्या व्हायरल व्हिडीओचा परिणाम माझ्यावरही झाला. हे मी टाळूच शकत नाही. हे सगळं त्यांच्याबरोबरही होतं आणि माझ्याबरोबरही होतं. माझे कधी व्हिडीओ व्हायरल झाले तर त्यांनाही विचारलं जातं. तसंच मलाही कॉल येतात की, तुझं काय म्हणणं आहे. आता मीच माझ्या वडिलांबाबत काय सांगणार?”.
आणखी वाचा – २२ वर्षांचा संसार मोडला; कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडप्याचा घटस्फोट, अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली…
पुढे तो म्हणाला, “ते माझे वडील आहेत. ते वयाने मोठे आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याला तेच जबाबदार आहेत. मी प्रत्येक गोष्टीची नेहमीच सकारात्मक बाजू पाहतो. मी जर त्यांचा मुलगा नसतो तर माझा जो गोड आवाज आहे तो माझ्याकडे नसता. एका सुपरस्टारचा प्रवास मला कधीच जवळून पाहता आला नसता. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. अशा खूप साऱ्या चुका आहेत ज्या माझ्याकडून घडल्या नाहीत. कारण वडिलांनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करायच्या नाहीत हे मी यामधून शिकलो”.
“अलिकडचाच त्यांचा व्हायरल व्हिडीओ मोठं उदाहरण आहे. कधी कधी बदलत्या पिढीवरही गोष्टी अवलंबून असतात. माझे वडील ज्या काळात काम करायचे तेव्हा हे सगळं चालायचं. हे बरोबर की चूक हे मी सांगू शकत नाही. पण हे सगळं तेव्हा असायचं. पण आताच्या काळात हे चालत नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी वडिलांशी बोललो. त्यांना समजावलं. त्यांनीही गोष्टी समजून घेतल्या. ते खूपच साधे आहेत. वेळेनुसार जे बदल झाले आहेत त्याची त्यांना कल्पनाही नाही. पण व्हिडीओचं प्रकरण घडल्यानंतर त्यांना नक्की काय झालं याची जाणीव झाली. मग त्यांनाही वाईट वाटलं”. आदित्यने योग्य पद्धतीने सगळं समजावून सांगितलं.





