स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण जिंकण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात कधी काही काही गोष्टींमध्ये असणारे निर्णय आश्रयकारक ठरतात. सध्या असाच एक निर्णय घेण्यात आलाय आदिपुरुष चित्रपटाच्या टीम कडून. आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मत्यांकडून चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर प्रत्येक थिएटर मध्ये एक सीट शक्तीचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत रायांसाठी ठेवण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे.(Adipurush Team Lord Hanuman)
का घेतला आहे असा निर्णय?(Adipurush Team Lord Hanuman)
जिथे प्रभू श्री रामांचा जागर केला जातो तिथे हनुमंत राय प्रकट होतात असं निर्मात्यांचा समज आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपट गृहात एक जागा मारुती रायांसाठी ठेवण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना सुद्दा या मारुतीरायांसोबत चित्रपट पाहता येईल. प्रभू श्री रामांच्या या सर्वात मोठ्या भक्ताला आमच्या कडून अनोखी आदरांजली वाहण्यात येणार असल्याचं चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून सांगण्यात आलं आहे.

सोबतच या सीटच्या बाजूच्या सीटची रक्कम देखील दुपट्ट असणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४०० कोटींची कामे केल्याचं सांगितलं जातंय. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार आदिपुरुष या चित्रपटाचे हक्क दोन राज्यांमध्ये विकले गेले आहेत आणि यांची रक्कम सुमारे १७० कोटींच्या आसपास आहे आणि प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ने या चित्रपटाचे हक्क २३० कोटींना विकत घेतले आहेत. या मिळालेल्या माहिती नुसार आदिपुरुष या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४०० कोटींच्या घरात प्रवेश केला.
हे देखील वाचा – त्या काळातही अशोक मामांनी सेट केला होता ‘हा’ फॅशन ट्रेंड शर्टची दोन बटणं नेहमी उघडीच का ठेवायचे अशोक मामा? मुलाखतीत सांगितलं कारण
आदिपुरुष चित्रपटात दाक्षिण्यात अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे सुद्दा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिगदर्शन सुद्दा मराठी मधील प्रसिद्ध दिगदर्शक ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलर, टिझर सोबतच चित्रपटांची गाणी सुद्दा आता ट्रेंडिंग वर दिसत आहेत. या गाण्यानंमध्ये सुद्धा मराठीतील प्रसिद्ध गायक जोडी अजय अतुल यांचा मोठा वाटा आहे. तर आता प्रदर्शनापूर्वी ४०० कोटींची कमाई करणारा आदिपुरुष प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Adipurush Team Lord Hanuman)